करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या १००४ झाली आहे. आतापर्यंत यापैकी २४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. देशभरातील करोना बळींची संख्या आता २४ झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक करोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे
राज्यात आज (रविवारी) नवीन सात रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यात मुंबईतील चार व पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 193 झाली आहे.
राज्यात कालपर्यंत एकूण 186 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आतापर्यंत कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार तर पुणे, सांगली व नागपूरमध्ये प्रत्येकी एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला. या नवीन सात रुग्णांमुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 193 पर्यंत वाढला आहे.
पुण्यात कालपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 होती. त्यात नवीन एकाची भर पडल्याने ती संख्या आता 25 झाली आहे.