पुणे- पुणे शहर आणि विभागात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पुण्याच्या महापौरांनी प्रशासनालाच जबाबदार धरले आहे. मात्र त्यांनी थेट आरोप न करता प्रशासनाकडेच बोटे दाखविणारी वक्तव्ये केली आहेत .खाजगी हॉस्पिटल चे ८० टक्के बेड्स ताब्यात न घेणे, खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीवर कारवाई न करणे ,चाचण्यांची आणि उपचारांची क्षमता वाढविण्यासाठी आपल्या अधिकारात निर्णय घेऊन प्रयत्न न करणे अशाप्रकरचे विविध ठपके महापौरांनी अखेर अप्रत्यक्ष का होईनात प्रशासनावरच ठेवले आहेत . या शिवाय पुण्यात कोरोना रुग्णाला उपचार देण्यासाठी जे जम्बो रुग्णालय उभारायचे आहे त्यासाठी महापालिका आर्थिक विवंचनेत असतानाही जवळपास ३०० कोटी + ७५ कोटी जम्बो सेंटरला देण्यास तयार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र महापालिकेलाही राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे अशी हि भूमिका स्पष्ट केली आहे .दरम्यान जम्बो रुग्णालयाच्या खर्चाबाबत नेमकी स्पष्ट भूमिका नसल्याचे यावरून बोलले जाणार आहे. एकीकडे रुग्णालयाला २५ टक्के देतो म्हणायचे आणि दुसरीकडे रुग्णालयाला ५० टक्के निधी देणाऱ्याच राज्य सरकारने पुन्हा मदत करावी असे म्हणायचे हि भूमिका अनेकांना दुटप्पी वाटते आहे.
श्री. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मांडलेले मुद्दे…
१) ऑक्सिजन व आयसीयू बेडस, व्हेंटिलेटरची कमतरता.
२) टेस्टिंगची क्षमता वाढविणे.
३) खाजगी हॉस्पिटलवरचे नियंत्रण.
४) महापालिकेस आर्थिक मदत.
५) मृत्यूची चौकशी करावी, त्यामधील दोष दूर करून मृत्यूदर नियंत्रणात आणावा.
खाजगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील
- ८०% बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश आहेत, मात्र कार्यवाही नाही
- बिलामध्ये नागरिकांची प्रचंड लूट असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे बिलांचे प्रिऑडिट करावे
- सेंट्रली बेड्स मॅनेजमेंट तातडीनं करण्यात यावे
(ससून /मनपा /खाजगी हॉस्पिटल) - खाजगी लॅबवर तूर्त तरी कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रशासनाचा लॅबशी समन्वय नाही.
- उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमले आहेत, त्यांची यावर नियंत्रण आणावे
महापालिका आर्थिक स्थिती
- ४ हजार ४४३ कोटी जमा
- ३००० कोटी – महसुली / मॅन्डेटरी खर्च / पगार / मेन्टेनन्स
- १४०० – विकासकामे (६५० कोटी मागील वर्षीच्या विकासकामे)
- शिल्लक ८०० कोटी
- जवळपास ३०० कोटी + ७५ कोटी जम्बो सेंटरला
- भांडवली कामांसाठी शिल्लक ४०० कोटी राहिले, यासाठी दरवर्षी ३००० कोटींची कामे होतात.
- हा सर्व विचार करता राज्य सरकारने तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी
कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज…
- ५५ हजार होणार जुलैअखेर (अंदाज ४६ हजार इतका होता)
- आज २९ जुलै रोजी एकूण रुग्ण एकूण ५१ हजार ७३८ तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजार ८६१ इतकी आहे.
अंदाज
१५ ऑगस्ट – एकूण १ लाख रुग्ण
३१ ऑगस्ट – एकूण २ लाख रुग्ण - यामुळे बेड्सचीची कमतरता, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मोठ्या प्रमाणावर लागतील.
- जम्बो सेंटर उभे उभारणीपर्यंत व्यवस्थाही अपुरी, त्याची सोय तातडीनं करण्यात यावी.
- ७ हजार ऑक्सिजन बेड्स, ४ हजार ०६५ आयसीयू बेड्स आणि १ हजार ९०० व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता असणार आहे.
मृत्यूंचे प्रमाण व अवस्था…
ससून रुग्णालयात दररोज रोज १२ मूत्यू कोरोनाव्यतिरिक्त होत आहेत, ही संख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महिन्याला ५० ते १००; म्हणजेच ढोबळपणे अधिक ४०० ते ५०० मृत्यू कोरोनाचे असतात, पण ते आकडेवारीत दर्शविले जात नाहीत.
- टेस्ट न होता हे मृत्यू होत आहेत, यात काही मृत्यू हॉस्पिटल पोहोचण्यापूर्वीचे आहेत.
- छातीच्या एक्स-रे ने अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.
- याबाबत सविस्तर चौकशी करुन भविष्यातील या मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.
टेस्टिंग क्षमता वाढविणे
- NIV आणि ससूनमध्ये चाचणीची मर्यादित क्षमता असल्याने ससूनमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठीची यंत्रणा उभी करणे याबाबत दोन महिने चर्चाच होत आहे, ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी.