Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘महारेरा’मुळे बांधकाम उद्योगात पारदर्शकता आणि शिस्त येईल – गौतम चटर्जी

Date:

क्रेडाई-महाराष्ट्रतर्फे पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन


पुणे – महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट, २०१६ (महारेरा) मुळे बांधकाम उद्योगात पारदर्शकता आणि शिस्त येईल. यामुळे अनेक गोष्टी सुलभ होतील आणि कायदा पाळणाऱ्यांना त्यामुळे कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे प्रमुख गौतम चटर्जी यांनी गुरुवारी येथे केले.
‘रेरा नियम व नियमन’ या विषयावर क्रेडाई-महाराष्ट्रतर्फे पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत  चटर्जी बोलत होते. क्रेडाई-नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई-नॅशनलचे रेरा समिती सदस्य सुहास मर्चंट, क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे आणि अन्य मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विकसक, बांधकाम व्यावसायिक, चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि कायदातज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी प्रास्ताविक  केले.तसेच राज्यातील ४० शहरांतील १००० पेक्षा अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.  तसेच  गौतम यांनी क्रेडाई सदस्यांच्या शंकांचे निरसन केले.
‘महारेरा’ची निवडक वैशिष्ट्ये समजावून सांगताना  चटर्जी म्हणाले, “गृहनिर्माणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. या कायद्याची अधिसूचना काढणारे व त्याची अंमलबजावणी करणारे आपले पहिले राज्य आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. एक मे २०१७ नंतर बांधकाम उद्योगातील सर्व व्यवहार ऑनलाईन करायचे आहेत. आम्ही ‘झिरो फूटफॉल-झिरो पेपर’चे धोरण स्वीकारले आहे. ‘महारेरा’मुळे पारदर्शकता आणि शिस्त येईल. त्यामुळे विकसक व त्यांच्या ग्राहकांमध्ये विश्वासाचे नाते तयार होईल. विश्वासाच्या नात्याची ही निर्मिती करणारे आम्ही केवळ माध्यम आहोत. बांधकाम व्यावसायिकांना आम्ही सर्वतोपरी मदत करू.”
बांधकाम व्यावसायिकांनी माहिती देताना प्रामाणिकता जपावी, असा सल्ला त्यांनी दिला. “तुम्ही माहितीची जबाबदारी घ्यायला हवी आणि बरोबर माहिती दिली जात असल्याची खात्री करावी. राज्यातील ग्रामीण असो वा शहरी, सर्व भाग या कायद्यांतर्गत येणार आहेत. चुकीच्या माहितीकरता तुम्ही जबाबदार असाल त्यामुळे ‘महारेरा’वर आपल्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे काम इतरांना सोपविणाऱ्यांनीही माहिती तपासून घ्यावी,” असे ते म्हणाले.
यावेळी या प्रसंगी रेराची वैशिष्ट्ये व प्रक्रियांची माहिती देणारे एक पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. क्रेडाईच्या युवक शाखेने घेतलेल्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारले आहे. “बांधकाम व्यावसायिकांसाठी हस्तपुस्तिका ठरावी, अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना केली आहे,” असे अखिल अग्रवाल म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...