माझ्या जडणघडणीत बी.एम.सी.सी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा : पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पुणे : माझ्या जडणघडणीत बी.एम.सी.सी महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकलो त्यांचा सत्कार करताना मला आज विशेष आनंद होत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत प्राइड ऑफ बी.एम.सी.सी पुरस्कार देवून शहीद मेजर कुणाल गोसावी आणि अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात बी.एम.सी.सी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक प्रा. प्र.चिं शेजवलकर आणि प्रा. चिं.ग वैद्य यांना गुरुवर्य पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त शहीद मेजर कुणाल गोसावी पुरस्काराने लेफ्टनंट कर्नल ओंकार बापट यांना तसेच व्यापारभूषण पुरस्काराने धन्यकुमार चोरडिया यांना गौरवण्यात आले. याशिवाय निपुण धर्माधिकारी,गंगाधर संगोराम, विद्याधर कुलकर्णी,नितीन किर्तने, योगेश धाडवे, व सुनिल गुदगे यांनाही पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, प्रा. शाळीग्राम,सुधीर गाडगीळ, माजी विद्यार्थी संघाचे कार्याध्यक्ष अरुण निम्हण, युवराज शहा, शरद कुंटे यांच्यासह महाविद्यालयाचे आजी – माजी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आपला प्रवास उलगडताना पालकमंत्री बापट म्हणाले, महाविद्यालयात असताना मी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण तेथे मला भाषण करता आले नाही. त्यावेळी मी मनाशी आयुष्यात  काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय केला. आणि त्याच जिद्दीने मी नगरसेवक ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास करू शकलो. त्यामुळे बी.एम.सी.सी महाविद्यालय हे माझे स्फूर्तीस्थान आहे अस म्हणाव लागेल. या महाविद्यालयाने राजकीय क्षेत्रासह  विविध क्षेत्रात तज्ज्ञ असणारे अनेक दिग्गज लोक दिलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जडण – घडणीत बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे असे मला अभिमानाने सांगावे वाटते.
आज या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असणाऱ्या मेजर कुणाल गोसावी यांच्या वीर मातापिता आणि पत्नीचा तसेच मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करायला मिळाला हा खरं तर माझा सन्मान आहे. असही ते यावेळी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड यांनी या सत्काराने जबाबदारी वाढल्याचे सांगितले. तर प्रा.वैद्य यांनी माजी विद्यार्थांनी केलेल्या या सत्काराने भारावून गेल्याचे मत व्यक्त केले. प्रा. शेजवलकर यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
बी.एम.सी.सी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत मेजर कुणाल गोसावी यांच्या वीर पत्नीला मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देण्यात आला. तर पालकमंत्री बापट यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची मदत दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...