पुणे. :-लोकांना भासणाऱ्या वैद्यकीय समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास करू आणि सर्वसामान्य लोकांना अद्यावत हॉस्पिटल आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायमच कटीबद्ध असू अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ससून जनरल हॉस्पिटल आणि कमला नेहरू व गाडीखाना हॉस्पिटल यांना प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी होणारे अर्भक मृत्यू टाळण्यासाठी न्यूनॉटल रेप्सरेटर या जिल्हा वार्षिक योजनेतुन ‘अॅप्रोटेक निओनेटल रेस्पिरेटर’ हे वैद्यकीय उपकरण आणि स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका दिल्या. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
ससून जनरल हॉस्पिटल आणि गाडीखाना येथे हे वैद्यकीय उपकरण तर कमला नेहरू हॉस्पिटलला फिरता दवाखाना व रुग्णवाहिका देण्यात आली. या एका उपकरणाच्या माध्यमातून २ बालकांना प्राणवायू पुरवला जाऊ शकतो.
ते पुढे म्हणाले कि, बालमृत्यूची वाढणारी संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय यंत्रणेला
अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करता यावे त्याचबरोबर त्यांच्या कामाची वेग वाढवा आणि एकही बालक दगावले जावू नये हा संदेश सर्वांपर्यंत जावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या येणाऱ्या पिढीसाठी गर्भवती महिलांना सकस आहार,आवश्यक औषधे हि योग्य वेळेत मिळून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असू. असेही ते म्हणाले त्याचबरोबर अशा कामांसाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत केली पहिजे. यामुळे अशी वैद्यकीय उपकरणे शहराबरोबरच जिल्ह्यातील व इतर अनेक रुग्णालयांना उपलब्ध करून देता येतील आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल.
महापौर मुक्ता टिळक,महापालिका आरोग्य अधिकारी साबणे,नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, राजेश येनपुरे,गायत्री खडके,आरती कोंढरे याप्रसंगी उपस्थित होते.