पुणे- अगोदरच महागाईच्या ज्वाळात होरपळनाऱ्या जनतेला आणखी जातिभेदाच्या खाईत ढकलून भाजप सरकार देशाची अवहेलना करीत आहे. खोटी आश्वासनं तर दिली पण आता सलोखा हि बिघडवला आहे . त्यामुळे सामाजिक समता ,शांतता ,आणि बंधुत्वासाठी आम्ही लक्ष्यवेधी म्हणून उपोषण करीत आहोत असे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
आज अलका टाॅकीज चौकात कॉंग्रेस पक्षाने भाजपा सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि जनतेत सलोखा राहावा या उद्देशाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , बाळासाहेब शिवरकर ,अरविंद शिंदे, अविनाश बागवे ,मनीष आनंद,बंडू नलावडे ,अजित दरेकर , शरद रणपिसे, गोपाळ तिवारी, नीता रजपूत,चांदबी नदाफ,शेखर कपोते, सोनाली मारणे,सतीश पवार, काका धर्मावत ,रफिक शेख ,विकास लांडगे ,लता राजगुरू, भारती कोंडे, शिवा मंत्री, राजू गायकवाड ,विश्वास दिघे, निलेश बोराटे आदी असंख्य मान्यवर कार्यकर्ते या वेळी सहभागी झाले होते .
अगोदर महागाई त्यात मनभेद ; देशभरातील असंतोषाचे जनक भाजप सरकार – रमेश बागवे
Date: