पुणे-देशातील ज्या महान विभूतींच्या, राष्ट्रपुरुषांच्या नावाने आयुष्यभर राजकारण आणि समाजकारण करत महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील अलिशान दालनात आणि सभागृहात अनेक पुढारी ,नेते पोहोचले … त्या महान विभूतींच्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची हि कहाणी …
तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचताना या प्रतिमा जिन्यात दिसतात . पण एकदा तिसऱ्या मजल्यावर आपण पोहोचलो, विविध पदाधिकाऱ्यांच्या वातानुकुलीत अलिशान दालनात , खाजगी दालनात (अँटी चेंबर्स) पोहोचलो कि या तस्वीरी आपणास दिसत नाहीत . तिथे दिसतात , आपापल्या पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे फोटो …. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महापालिकेची मुख्य सभा भरते तिथे महाराजांची तसबीर तर असणारच.. . पण घटनाकार डॉ. आंबेडकर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या तसबिरी पदाधिकाऱ्यांच्या दालनात,पक्षांच्या दालनात अगर सभागृहात दिसत नाही. इथे देखील त्यांच्या नावांचे राजकारण चालते पण कदाचित या तसबिरींची येथे गरज भासत नसावी .
महापालिकेचा तिसरा मजला …. म्हणजे महापालिकेचे सर्व पदाधिकारी , विविध पक्षांची दालने आणि अँटी चेंबर्स येथे आहेत.येथे सर्व नगरसेवक, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि अडलेली ,नडलेली अनेक कामे घेवून आलेले सामान्य नागरिक ,बडे नागरिक यांची वर्दळ असलेला हा महत्वपूर्ण मजला आहे. या शिवाय पालिकेत लगतच्या इमारतीत अधिकाऱ्यांची वातानुकुलीत दालने आहेत . नौकर , चाकर , कमी पगारातले सुरक्षा रक्षक , हुजरेगिरी करणारे ,वाद विवाद करणारे , न्यायासाठी हेलपाटे मारणारे , ठेके मिळवायला येणारे अशा अनेकांची वर्दळ पालिकेत सर्वत्र असते . पण राष्ट्रपिता महात्मा गांधी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,इंदिरा गांधी ,पंडित नेहरू यांच्या तसबिरी असणारा परिसर पाहिला तर तो बहुतांशी परिसर जिन्यातच आढळून येतो .नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले, राहुल गांधी, सोनिया गांधी , शरद पवार , सुप्रिया सुळे या सर्वांच्या प्रतिमा अलिशान दालनात विराजमान आहेत . पण कित्येक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , इंदिरा गांधी ,अण्णाभाऊ साठे आदी मान्यवरांच्या तसबिरी जिन्यातच आहेत .स्व. राजीव गांधींची एक तसबीर व्हरांड्यात आहे.
हयात गेली जिन्यात ..कहाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची …
Date: