पुणे- इतिहासात आणि वर्तमानात सुद्धा भारतभूमीत महिलांचे योगदान मोठे मोलाचे राहिले आहे असे सांगत जिजाऊ,मुक्ताई, जनाबाई ,सावित्रीबाई,यांच्या पासून कस्तुरबा गांधी ,इंदिरा गांधी ते आजतागायत च्या विविध नामवंत महिलांच्या कार्याबाबतच्या आठवणी माजी आमदार उल्हास पवार यांनी येथे जागविल्या .
पुणे शहर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना सेवाव्रत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , सौ. जेनब रमेश बागवे,यांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला आणि सोनिया गांधी यांना शुभेच्छ्या देण्यात आल्या .. काका धर्मावत ,संगीता तिवारी, अजित दरेकर नीता राजपूत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
अॅड .उज्वला पवार ,बेनझीर तांबोळी ,डॉ. शीतल धडफळे,अंजली खमितकर,आदिती द्रविड,जुईली जोगळेकर,निकिता मोघे,निवेदिता साबू, मिरज शेख यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या शिवाय ७१ अंगणवाडी सेविकांना साडी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला .
शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बागवे यावेळी म्हणाले,गांधी घराण्याने देश सेवेसाठी वाहून घेतले आहे . स्वातंत्र्यासाठी लढलेला एकमेव कॉंग्रेस पक्ष आहे . स्त्री पुरुष असा भेद न करता त्यांनी हा लढा सातत्याने दिला . सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारून देशसेवेचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला . यानिमित्त सोनिया जींच्या वाढदिवशी सेवाव्रत पुरस्काराने आपापल्या क्षेत्रात झुंज देत चांगले काम करणाऱ्या महिलांचा गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे .
कॉंग्रेस भवनाच्या ऐतिहासिक वास्तूत , देशसेवा करणाऱ्या गांधी घराण्यातील सोनियाजींच्या वाढ दिवशी हा पुरस्कार मिळतो आहे याबद्दल पुरस्कारार्थी महिलांनी आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त केला.