संजय काकडेंनी दादागिरी केली तर मी पुण्यात येवून बघतो त्यांच्याकडे .. नारायण राणेंचा इशारा

Date:

पुणे -संजय काकडेंनी दादागिरी केली तर मी पुण्यात येवून पाहतो त्यांचे … असे आव्हान देत भाजपवर तर  शिवसेनेचा वाघ आता मांजर बनलेला आहे अशा शब्दात टीका करीत राज्यातील हे सरकार 21 तारखेपर्यंत राहील का नाही माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत सरकारच्या भविष्याविषयी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शंका उपस्थित केली आहे.

 पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडेसहा वाजता नारळ फोडून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.  गंज पेठेमधील महात्मा फुले स्मारकासमोर नारायण राणे यांच्या सभेने प्रचाराला सुरुवात झाली.  यावेळी पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, विधान परिषद आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते अरविंद शिंदे आणि उमेदवार उपस्थित आहेत.
सभेत नारायण राणे पुढे म्हणाले की, प्रत्येकाला काकडे सारखा खासदार व्हावे वाटते. कारण उमेदवारी ही मिळते आणि पैसा ही खर्च करता येतो.यावरून भाजप ला आरबीआय जॉइन झाली का ? असाही प्रश्न त्यांनी केला. भाजप शिवसेनेने राज्याला मागील अडीच वर्षात 10 वर्ष मागे घेऊन गेले. भाजप सुसंकृत पक्ष वाटायचा पण आता पुण्यात आलो की गुंडाचा पक्षाचा वाटतो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या विरोधात तोंडाने मर्डर करतात. ते आणखी बाकी काहीही करू शकत नाही. तर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी खूर्ची नागपूरला घेऊन जावी. काय तर म्हणे पाच वर्ष सत्तेत राहणार, असेही टिकास्त्र सोडले. तर शिवसेनेकडे आता वाघ राहिला नाही. वाघाची मांजर झाली आहे, अशी टीका शिवसेनेवर केली.
 तर खासदार संजय काकडे राजकारणात काय करतात, असा प्रश्न करत दादागिरी केली. तर शेवटचे दोन दिवस मी येऊन बसतो बघू काय दादागिरी करता, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
शहराबाबत राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून कायम आदर आहे. पुणे शहर पहिल्यासारखे राहीले नाही. पुणे शहरात मागील अडीच वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणीही सुरक्षित नाही.असेही ते म्हणाले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...