Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नरेंद्र मोदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -रमेश बागवे

Date:

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांचे छायचित्र हटवून त्यांच्या अपमान केला असून हिटलर प्रमाणे हा निर्णय घेतला आहे.या त्यांच्या कृत्याबदल मोदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी पुणे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

राष्ट्रपती महात्मा गांधी यांचे खादी ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवरील छायचित्र हटवून नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आल्या प्रकरणी  पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

या आंदोलनात रामभाऊ मोझे,महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड,उपमहापौर मुकारी अलगुडे , दीप्ती चवधरी,संगीता तिवारी,कमल व्यवहारे सदानंद शेट्टी , सुधीर जानज्योत ,सोनाली मारणे,विकास लांडगे , मुक्तार शेख,लक्ष्मी घोडके,शोभना पणीकर , राजा महाजन,नीता रजपूत ,राजू साठे,प्रकाश आरणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बागवे यावेळी म्हणाले कि , गांधीजींच्या विचाराने प्रवृत्त होऊन नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान अशा बड्या नेत्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून, वांशिक भेदभाव आणि परकीय साम्राज्याच्या विरोधात लढा दिला . इंग्लंड मधील गोल बैठकीला जाताना धोतर परिधान करून गांधीजी केले होते, तर मोदी यांनी १० लाखांचा  सूट घालून विदेश दौरा केला . मोदी आणि गांधी हि तुलना होऊ शकत नाही त्यांच्या विचारात मोठी दरी आहे . महात्मा गांधीची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणून त्यांचे नाव आणि विचार संपविण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत यावेळी  केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...