Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन …

Date:

पुणे- शहराचे माजी महापौर आणि माजी पर्यटन राज्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड (वय 67) यांचे आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.  

 छाजेड हे  काही दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.  नुकत्याच झालेल्या पुण्यातील   संविधान मोर्चात तसेच कॉंग्रेसच्या विविध आंदोलनात आणि कॉंग्रेस भवनात ते सातत्याने दिसत होते .त्यांच्या अचानक अशा जाण्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला . आज  सायं.६.०० वा, काँग्रेस भवन येथे शोकसभा आयोजित केली आहे.

 चंद्रकांत छाजेड यांचा जन्म 1950 रोजी झाला. त्यांनी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात अनेक जबाबदा-या पार पाडल्या. त्यांनी बोपोडी येथून 1978 ते 2002 या दरम्यान नगरसेवकपद भूषवले. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ  यांचे ते नजीकचे सहकारी म्हणून ओळखले जात , त्यानंतर सुरेश कलमाडी यांच्यासमवेत त्यांनी  पुण्याच्या विकासात योगदान दिले . याच नगरसेवकपदाच्या काळात 1987 ते 1988 या एक वर्षाच्या काळात पुणे शहराचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. यानंतर त्यांनी 1992 ते 2002 पर्यंत महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून काम पाहिले. तर 1999 ते 2009 मध्ये आमदार होते. तसेच मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्री मंडळात ते पर्यटनमंत्री होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ - पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजा कोसळून...