पुणे – पुणे महानगरपालिकेने शहरातील कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच एजन्सी नेमण्याचा निर्णय घेणार आहे. आतापर्यंत स्वच्छ संस्थेकडून शहरात कचरा संकलन आणि विघटनाचे काम करण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या एकच एजन्सी नेमल्यामुळे स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांचा रोजगार धोक्यात आला आहे. स्वच्छ संस्थेचा करार संपुष्टात आला असून तो वाढण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला आहे. जुन्या प्रस्तावाला सातत्याने थोड्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. सत्ताधारी एकाच एजन्सीला देण्यात उत्सुक आहेत.
ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी स्वच्छ संस्थेला पाठिंबा देऊन प्रशासन घेणाऱ्या निर्णयाला निषेध नोंदविण्यासाठी आज महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी कामगार नेते बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.