पुणे : श्री सद्गुरू गजानन महाराज की जय चा जयघोष… गं्रथ पठणातून निर्माण झालेले अध्यात्मिक वलय… आणि तब्बल -१६०० हून अधिक भक्तांनी एकत्रित येत श्री गजानन विजय गं्रथाचे केलेले सामुदायिक पठण… अशा श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने भक्तीमय झालेल्या वातावरणात आळंदी कार्तिक वारीनिमित्त आयोजित श्री गजानन विजय गं्रथाचा भव्य सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला. या पारायण सोहळ््यात तब्बल १८५० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2022/11/W06-1024x670.jpg)
श्री गजानन महाराज (शेगांव) सेवाधारी परिवार, पुणे या संस्थेतर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ह.भ.प.ज्योत्स्ना मोदले यांना श्री गजानन महाराज सेवाधारी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. चिंचवड येथील डॉ.गजानन खासनीस यांच्या उपस्थितीत आणि न्यासातील सेवाधा-यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदन कस्तुरे व पदाधिकारी, सेवाधारी उपस्थित होते.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ््याचे यंदाचे १६ वर्ष आहे. प.पू. स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज उर्फ दादा महाराज यांच्या उपासनेचा आणि अध्यात्माचा वारसा पुढे नेणा-या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.
ह.भ.प.ज्योत्स्ना मोदले म्हणाल्या, मंदिरात उपासना सुरु करणे सोपे असते, मात्र ती सतत प्रवाहित ठेवणे अवघड असते. परमेश्वराची मंदिरात स्थापना सहजपणे करणे शक्य असते, मात्र भक्तांच्या ह्रदयात परमेश्वराची स्थापना होणे कठिण असते. परंतु महाराजांच्या कृपेने हे शक्य होत आहे. भक्तांनी मंदिरात एकत्रित यावे आणि संघटित होणे, हे महत्वाचे आहे. त्यातूनच विधायक कार्य चांगल्या पद्धतीने घडू शकते.
पारायण सोहळ््यादरम्यान लायन्स क्लब आॅफ पुणे,सहकारनगर यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, चष्मे वाटप, रक्त व हिमोग्लोबिन, शर्करा तपासणी व जनजागृतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४५० जणांची तपासणी करण्यात आली.