पुणे: राज्यातील बाजारपेठेत चणाडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्यादृष्टीने स्वस्त दराने चणाडाळ विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 25 ऑक्टोबर,2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना प्रती व्यक्ती 70 रुपये किलो दराने पुढील ठिकाणी चणाडाळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
औंध, बाणेर, हिंजवडी, थेरगांव (काळेवाडी फाटा), रावेत, चिंचवड, कल्याणीनगर, हडपसर, पद्मावती, आंबेगांव बु. कोंढवा व एनआयबीएम रोड येथील डी मार्ट स्टोअरमध्ये, चिंचवड, हडपसर, कोथरुड, विश्रांतवाडी, सिंहगड रोड व हिंजवडी येथील बिग बजार स्टोअरमध्ये चणा डाळ उलपब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच टिळक रोडवरील ग्राहक भवन येथील जनता ग्राहक मध्यवर्ती सहकारी संघ येथे चणा डाळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.