Industrialist

बँक ऑफ इंडियातर्फे विशेष योजना व ऑफर्ससह नारी शक्ती बचत खात्याचा शुभारंभ

मुंबई – बँक ऑफ इंडिया या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एका बँकेने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी मुंबईतील प्रमुख कार्यालयात संचालक मंडळाच्या उपस्थितीत ‘नारी...

उडचलो बनली ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅव्हल बुकिंगवर कॅश ऑन डिलिव्हरी सेवा ऑफर करणारी पहिली ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी

पुणे, ०९ डिसेंबर २०२३ : उडचलो ही राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार विजेती आणि आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल फर्म असून, या फर्मने पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानस्नेही नसलेल्या ग्राहकांसाठी प्रवास बुकिंगसाठी ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी’ (COD) सेवा सुरू केली आहे. पुण्यातील ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTA) क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास नियोजन आणि पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, त्यांना प्रवास बुक करण्याचा अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच उडचलोने (udChalo) आपली सेवा गैर-संरक्षण कर्मचार्‍यांसाठीही सुरू केली आहे. उडचलोची वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे केलेल्या सर्व प्रवास बुकिंगसाठी COD सेवा उपलब्ध असेल. ही सेवा फ्लाइट्स आणि व्हेकेशन्ससाठीही असेल. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक आता चेकआऊटवर COD पर्याय निवडू शकतात आणि त्यांच्या दारात तिकीट वितरण केल्यावर त्यांच्या बुकिंगसाठी रोख रक्कम देऊ शकतात. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक परिचित, सुरक्षित आणि आरामदायी पेमेंट पद्धत उपलब्ध करून ऑनलाइन पेमेंट किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज राहात नाही. शिवाय, ही सेवा लष्कराच्या दिग्गजांकडून पाहिलीजी केली जाईल. यासाठी देशभरातील माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळ निवृत्त झालेल्या लष्करी जवानांसाठी पुन्हा रोजगार निर्माण करण्यास मदत होईल. उडचलोचे सीईओ श्री रवि कुमार म्हणाले की, “विशेषतः   पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅश-ऑन-डिलिव्हरी सेवा देणारे पहिले OTA प्लॅटफॉर्म असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ऑनलाइन प्रवास बुकिंग आणि पेमेंटच्या बाबतीत ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याची आम्हाला जाणीव आहे. फसवणूकीला लष्करातील दिग्गज बळी पडल्याच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रवेशयोग्यता, सुरक्षितता आणि सुविधा वाढवणे आहे. त्यांना सहजतेने त्यांच्या सहली बुक करण्यास सक्षम करणे आणि विश्वास निर्माण करणे ही या उपक्रमामागील भावना आहे.” अपवादात्मक सेवा आणि सोयीसाठी उडचलोची वचनबद्धता त्याच्या सर्व ग्राहकांसाठी आहे आणि ही नाविन्यपूर्ण सेवा त्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. या उपक्रमांतर्गत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत बुकिंग करता येईल. या उपक्रमाची क्षमता ओळखून आणि ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून, उडचलोने लवकरच COD सेवा भारताच्या इतर भागांमध्ये विस्तारित करण्याची योजना आखली आहे. यामुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास सुलभ आणि आनंददायी होईल.

मोहिते रेसिंगने फ्रँचायझी संघाचे अधिग्रहण करत सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये केला प्रवेश

पुणे, ०८ डिसेंबर २०२३ : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL), भारतातील मोटारस्पोर्ट्सचे संपूर्ण चित्राला नवा पुन्हा आकार देण्यास समर्पित असून आयएसआरएलने नवीन पॉवरहाऊसचे आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. टीम मोहिते रेसिंग ही अभिषेक मोहिते यांच्या उत्साही नेतृत्वात असलेली टीम आहे. यासह लीगने देशातील मोटरस्पोर्टचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा संघ कोल्हापुरात राहणार आहे. मोहिते समूहाला अनेक दशकांचा समृद्ध वारसा आहे. बांधकाम उद्योगातील हा आघाडीचा समूह आहे. धरणे, इमारती, खाणकाम आणि भूकामाच्या बांधकामात विशेषतः असलेला हा समूह आता वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल्स, शिक्षण, जलविद्युत आणि ऊर्जा क्षेत्रातही आहे. बांधकाम उद्योगाच्या पलीकडेही कंपनी अभिमानाने मोहितेची रेसिंग अॅकॅडमी चालवते. या अॅकॅडमीमध्ये  २००६ पासून भारतातील सर्वात मोठा गो-कार्टिंग ट्रॅक आहे. समाजातील सर्वांना सामावून घेणे, युवा विकास, बोर्डरूमच्या पलीकडे उत्कृष्टतेची संस्कृती वाढवण्याची कंपनीची कटीबद्धता यातून दिसून येते. मोहिते समूह हा ऊर्जा शाश्वतता, क्रीडा आणि भविष्य-केंद्रित दृष्टी या कटिबद्धतेसह बांधकाम कौशल्य एकत्रित करणारी, गतिशील आणि बहुआयामी संस्था म्हणून उभी आहे. टीम मोहिते रेसिंगचे अभिषेक मोहिते यांनी या नवीन भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला: "टीम मोहिते रेसिंगसह सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी एक अतुलनीय गौष्ट असून एक खरा मैलाचा दगड आहे. माझ्यात रेसिंगसाठी जी पॅशन आहे, तशीच पॅशन या स्पर्धेतही दिसून येतेय. या रेसिंग स्पर्धेचा भाग होण्याचा आनंद आगळाच आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही या क्षेत्रातील प्रतिभांवत तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि भारतीय मोटरस्पोर्ट लँडस्केप विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. सुपरक्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि सह-संस्थापक वीर पटेल यांनी मोहिते रेसिंगच्या टीमचे हार्दिक स्वागत केले. अशा प्रतिभावान संघाचे आमच्या लीगमध्ये स्वागत करताना आम्हाला कमालीचा अभिमान वाटतो. त्यांचे मोटरस्पोर्ट्सचे ज्ञान आणि समर्पण भारतातील मोटरस्पोर्ट्स दृश्यात क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे जुळते. देशभरातील चाहत्यांसाठी मोटरस्पोर्ट्समध्ये सर्वोत्तम मनोरंजन आणि गुणवत्ता प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे आणि एकत्रितपणे आम्ही हे प्रत्यक्षात आणू. टीम मोहिते रेसिंगच्या समावेशासह, सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने क्षितिजावर अधिक रोमांचक घोषणांसह पाच संघांची घोषणा केली आहे. ही लीग भारतातील मोटारस्पोर्टचा दर्जा वाढवणार असून, चाहत्यांना आणि सहभागींना सारख्याच आनंददायक अनुभवांनी भरलेल्या हंगामाचे आश्वासन देत आहे. रायडर नोंदणी, खेळाडू लिलाव आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राच्या शेड्यूल याविषयी अधिक तपशीलांसाठी, कृपया येथे अधिकृत SXI वेबसाइटला भेट द्या https://indiansupercrossleague.com/

स्कॅनिया इंडियाने पीपीएस मोटर्ससोबत भागीदारी करतखाण क्षेत्रातील उपस्थिती मजबूत केली

हैदराबाद: स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि.ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री...

क्लोव्हर इन्फोटेकने पुण्यात स्थापन केले ओरॅकलवर भर देणारे जागतिक केंद्र

पुणे-क्लोव्हर इन्फोटेकने त्यांचे अत्याधुनिक ओरॅकल केंद्रित ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) पुण्यात सुरू केले आहे. 200-सीटर जागतिक ओरॅकल केंद्रित COE मध्ये ओरॅकलमधील व्यापक अनुभवासह विषय, डोमेन आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेले लोक असतील. क्लोव्हर इन्फोटेक आणि ओरॅकलची भागीदारी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. ओरॅकलच्या ऑन-प्रिमाइसेस आणि क्लाउडवरील काही अंमलबजावणीसाठी क्लोव्हर इन्फोटेक जबाबदार आहे. भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि जगभरातील ओरॅकल ग्राहकांना उच्च दर्जाची सेवांचा देण्यासाठी जागतिक ओरॅकल केंद्रित COE हा एकप्रकारे योग्य असा विस्तार आहे. क्लोव्हर इन्फोटेकचा भारत, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेमध्ये झपाट्याने विस्तार होत आहे आणि अलीकडेच गेल्या चार महिन्यांत चार फ्यूजन करारांसह अनेक ओरॅकल करार जिंकल्या आहेत. आपले मनोगत व्यक्त करताना क्लोव्हर इन्फोटेकचे अध्यक्ष जावेद तापिया म्हणाले की, “आमचे ओरॅकल-केंद्रित COE हे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी, संशोधनासाठी आणि नवनवीन उपक्रमांसाठी जागतिक केंद्र असेल. हे ओरॅकल उत्पादनांसाठी नवीन व्यवहारिक संरचना, प्रवेगक आणि पद्धती तयार करेल. हे जागतिक COE आमच्या ग्राहकांना त्यांच्या ओरॅकल गुंतवणुकीतून सर्वोत्तम ROI आणि मूल्य मिळविण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी खरोखरच आधुनिक अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञान तयार करेल.” EMEA, क्लोव्हर इन्फोटेकचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष दास याप्रसंगी भाष्य करताना म्हणाले की, “ओरॅकल केंद्रित COE ओरॅकल उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आणि ग्राहकांना व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम-इन-क्लास ऍप्लिकेशन्स आणि तंत्रज्ञानासह सक्षम करताना  व्यवहारिक सोल्युशन्स तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची जोरदार साक्ष देते.आम्ही दर महिन्याला उच्च ओरॅकल डीलसह आमचा व्यवसाय झपाट्याने वाढवत असताना, आमचे ओरॅकल केंद्रित COE आमच्या ग्राहकांसाठी आणि ओरॅकलसाठी उत्कृष्ट सेवा, नाविन्य आणि मूल्य निर्मितीचे प्रतीक आहे. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना ओरॅकल उत्पादने आणि व्यवहारिक कार्यक्षमता आणि व्यवसाय गतीसाठी सोल्युशन्सच्या अंमलबजावणीचा आवश्यक आत्मविश्वास आणि आश्वासन देईल.”

Popular