पुणे, ०८ डिसेंबर २०२३ : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL), भारतातील मोटारस्पोर्ट्सचे संपूर्ण चित्राला नवा पुन्हा आकार देण्यास समर्पित असून आयएसआरएलने नवीन पॉवरहाऊसचे आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. टीम मोहिते रेसिंग ही अभिषेक मोहिते यांच्या उत्साही नेतृत्वात असलेली टीम आहे. यासह लीगने देशातील मोटरस्पोर्टचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा संघ कोल्हापुरात राहणार आहे.
मोहिते समूहाला अनेक दशकांचा समृद्ध वारसा आहे. बांधकाम उद्योगातील हा आघाडीचा समूह आहे. धरणे, इमारती, खाणकाम आणि भूकामाच्या बांधकामात विशेषतः असलेला हा समूह आता वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल्स, शिक्षण, जलविद्युत आणि ऊर्जा क्षेत्रातही आहे.
बांधकाम उद्योगाच्या पलीकडेही कंपनी अभिमानाने मोहितेची रेसिंग अॅकॅडमी चालवते. या अॅकॅडमीमध्ये २००६ पासून भारतातील सर्वात मोठा गो-कार्टिंग ट्रॅक आहे. समाजातील सर्वांना सामावून घेणे, युवा विकास, बोर्डरूमच्या पलीकडे उत्कृष्टतेची संस्कृती वाढवण्याची कंपनीची कटीबद्धता यातून दिसून येते.
मोहिते समूह हा ऊर्जा शाश्वतता, क्रीडा आणि भविष्य-केंद्रित दृष्टी या कटिबद्धतेसह बांधकाम कौशल्य एकत्रित करणारी, गतिशील आणि बहुआयामी संस्था म्हणून उभी आहे.
टीम मोहिते रेसिंगचे अभिषेक मोहिते यांनी या नवीन भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला: “टीम मोहिते रेसिंगसह सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी एक अतुलनीय गौष्ट असून एक खरा मैलाचा दगड आहे. माझ्यात रेसिंगसाठी जी पॅशन आहे, तशीच पॅशन या स्पर्धेतही दिसून येतेय. या रेसिंग स्पर्धेचा भाग होण्याचा आनंद आगळाच आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही या क्षेत्रातील प्रतिभांवत तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि भारतीय मोटरस्पोर्ट लँडस्केप विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
सुपरक्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सह–संस्थापक वीर पटेल यांनी मोहिते रेसिंगच्या टीमचे हार्दिक स्वागत केले. अशा प्रतिभावान संघाचे आमच्या लीगमध्ये स्वागत करताना आम्हाला कमालीचा अभिमान वाटतो. त्यांचे मोटरस्पोर्ट्सचे ज्ञान आणि समर्पण भारतातील मोटरस्पोर्ट्स दृश्यात क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे जुळते. देशभरातील चाहत्यांसाठी मोटरस्पोर्ट्समध्ये सर्वोत्तम मनोरंजन आणि गुणवत्ता प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे आणि एकत्रितपणे आम्ही हे प्रत्यक्षात आणू.
टीम मोहिते रेसिंगच्या समावेशासह, सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने क्षितिजावर अधिक रोमांचक घोषणांसह पाच संघांची घोषणा केली आहे. ही लीग भारतातील मोटारस्पोर्टचा दर्जा वाढवणार असून, चाहत्यांना आणि सहभागींना सारख्याच आनंददायक अनुभवांनी भरलेल्या हंगामाचे आश्वासन देत आहे.
रायडर नोंदणी, खेळाडू लिलाव आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राच्या शेड्यूल याविषयी अधिक तपशीलांसाठी, कृपया येथे अधिकृत SXI वेबसाइटला भेट द्या https://indiansupercrossleague.com/