पुणे-क्लोव्हर इन्फोटेकने त्यांचे अत्याधुनिक ओरॅकल केंद्रित ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) पुण्यात सुरू केले आहे. 200-सीटर जागतिक ओरॅकल केंद्रित COE मध्ये ओरॅकलमधील व्यापक अनुभवासह विषय, डोमेन आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेले लोक असतील. क्लोव्हर इन्फोटेक आणि ओरॅकलची भागीदारी दोन दशकांहून अधिक जुनी आहे. ओरॅकलच्या ऑन-प्रिमाइसेस आणि क्लाउडवरील काही अंमलबजावणीसाठी क्लोव्हर इन्फोटेक जबाबदार आहे. भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि जगभरातील ओरॅकल ग्राहकांना उच्च दर्जाची सेवांचा देण्यासाठी जागतिक ओरॅकल केंद्रित COE हा एकप्रकारे योग्य असा विस्तार आहे. क्लोव्हर इन्फोटेकचा भारत, मध्य, पूर्व आणि उत्तर अमेरिकेमध्ये झपाट्याने विस्तार होत आहे आणि अलीकडेच गेल्या चार महिन्यांत चार फ्यूजन करारांसह अनेक ओरॅकल करार जिंकल्या आहेत.
आपले मनोगत व्यक्त करताना क्लोव्हर इन्फोटेकचे अध्यक्ष जावेद तापिया म्हणाले की, “आमचे ओरॅकल-केंद्रित COE हे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी, संशोधनासाठी आणि नवनवीन उपक्रमांसाठी जागतिक केंद्र असेल. हे ओरॅकल उत्पादनांसाठी नवीन व्यवहारिक संरचना, प्रवेगक आणि पद्धती तयार करेल. हे जागतिक COE आमच्या ग्राहकांना त्यांच्या ओरॅकल गुंतवणुकीतून सर्वोत्तम ROI आणि मूल्य मिळविण्यास सक्षम करेल आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी खरोखरच आधुनिक अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञान तयार करेल.”
EMEA, क्लोव्हर इन्फोटेकचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष दास याप्रसंगी भाष्य करताना म्हणाले की, “ओरॅकल केंद्रित COE ओरॅकल उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची आणि ग्राहकांना व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम-इन-क्लास ऍप्लिकेशन्स आणि तंत्रज्ञानासह सक्षम करताना व्यवहारिक सोल्युशन्स तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची जोरदार साक्ष देते.आम्ही दर महिन्याला उच्च ओरॅकल डीलसह आमचा व्यवसाय झपाट्याने वाढवत असताना, आमचे ओरॅकल केंद्रित COE आमच्या ग्राहकांसाठी आणि ओरॅकलसाठी उत्कृष्ट सेवा, नाविन्य आणि मूल्य निर्मितीचे प्रतीक आहे. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना ओरॅकल उत्पादने आणि व्यवहारिक कार्यक्षमता आणि व्यवसाय गतीसाठी सोल्युशन्सच्या अंमलबजावणीचा आवश्यक आत्मविश्वास आणि आश्वासन देईल.”