कार्टूनिस्ट्स कंबाइन’ च्‍या नूतन कार्यकारिणीची बैठक संपन्‍न

Date:

 

पुणे- ‘कार्टूनिस्ट्स  कंबाइन’ च्‍या नूतन कार्यकारिणीची बैठक चारुहास पंडित यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नुकतीच  संपन्न झाली. यावेळी नूतन अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार,  विश्‍वास सूर्यवंशी, राधा गावडे, अमोल  ठाकूर, भटू बागले, दिनेश धनगव्‍हाळ, प्रभू केळुस्‍कर, अरविंद  गाडेकर, राजेंद्र सरग आदी व्‍यंगचित्रकार उपस्थित होते. प्रारंभी मावळतेअध्‍यक्ष चारुहास पंडित यांनी अध्‍यक्षपदाचा कार्यभार श्री. मेहेत्रे यांच्‍याकडे  सोपविला.  काही अपरिहार्य कारणामुळे ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांनी उपाध्‍यक्षपदाची जबाबदारी स्‍वीकारणे शक्‍य नसल्याचे कळवल्‍याने रवींद्र बाळापुरे यांची उपाध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली.

व्‍यंगचित्रकलेचे रसिक वाढविण्‍यासाठी व्‍यापक प्रयत्‍न करण्‍याचे बैठकीत ठरवण्‍यात आले. कार्टूनिंग हा विषय अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट व्‍हावा, व्‍यंगचित्रकारांना पत्रकारांप्रमाणे महाराष्‍ट्र शासनाची अधिस्‍वीकृती पत्रिका मिळावी,  प्रतीवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी मध्‍ये अखिल भारतीय स्‍तरावर व्‍यंगचित्रकारांचे संमेलन घेण्‍यात यावे, विभागनिहाय वेगवेगळे उपक्रम राबवून व्‍यंगचित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करावा याबाबत बैठकीत चर्चा झाली.

कंबाईनची सभासद नोंदणी मोहीम सुरु करण्‍यात आली असून सभासद शुल्‍क वार्षिक  300 रुपये निश्चित करण्‍यात आले आहे. सभासद होण्‍यासाठी नियम पुढीलप्रमाणे असून अर्जदार मराठी भाषिक असावा, अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्‍त असावे, अर्जदाराची किमान दहा व्‍यंगचित्रे मान्‍यताप्राप्‍त वर्तमानपत्रे, नियतकालिक‍, पुस्‍तक किंवा इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमातून प्रसिध्‍द झालेली असावी.  विहीत नमुन्‍यातील अर्ज पासपोर्ट आकारातील स्‍वत:च्‍या रंगीत  छायाचित्रांसह  भरुन कार्यकारिणीच्‍या सदस्‍यांकडे देता येईल.

फोटो मध्ये कोण कोण ?–

डावीकडून) राजेंद्र सरग(औरंगाबाद ),विश्वास सुर्यवंशी(पुणे), सौ.राधा गावडे(पालघर),प्रभु केळूस्कर(मुंबई), अमोल ठाकुर (अकोला), भटू बागले(मुंबई),दिनेश धनगव्हाळ(धुळे), (खाली बसलेले डावीककडून) महेंद्र भावसार-सचिव(कल्याण),विवेक मेहेत्रे-अध्यक्ष(ठाणे),रविंद्र बाळापुरे-नुतन उपाध्यक्ष(अमरावती), चारुहास पंडित-मावळते अध्यक्ष (पुणे),अरविंद गाडेकर-खजिनदार(संगमनेर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोलची जुनी गाडी इलेक्ट्रिक करून देण्याचे दावे किती खरे? लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी सावधान!

पेट्रोल गाडीचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर कायदेशीर; मात्र प्रमाणित किट, अधिकृत...

सोन्याच्या दरात २५ हजारांची घसरण होणार? ग्राहकांनी खरेदीसाठी थांबावे की आताच सोने घ्यावे?

प्रति १० ग्रॅम दर ₹१.२५ लाखांपर्यंत घसरण्याची बाजारात चर्चा;...

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...