पुणे : कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. त्याचा भारतातील व राज्यातील प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्याच धर्तीवर शाळा महाविद्यालये, सिनेमागृह, बाजारपेठा, छोटे मोठे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जात आहे. आता शहरातील पेट्रोलपंप देखील उद्या(शनिवार दि. २१) पासून सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिलर असोसिएशनने दिली आहे . या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे.