पुणे- सर्वधर्मीय सण सर्वानी एकत्र साजरे करून एकात्मता वाढवावी ,या उद्देशाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पुण्यातील कार्यक्रमात सर्वधर्मीय भगिनींकडून राखी बांधून घेतली . राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित कार्यक्रमात संयोजक लतीफ मगदूम यांनी गरवारे महाविद्यालय शनिवारी सायंकाळी येथे हा उपक्रम केला . सर्व धर्मीय महिलांनी राज्यपाल महोदयांबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मंच मार्गदर्शक इंद्रेशकुमार ,पुण्याचे बिशप थॉमस डाबरे याना राखी बांधली