पुणे-शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती तर्फे ” गोदी १९ विषाणू ” यांची प्रतीकात्मक होळी दहन काँग्रेस भवन येथे करण्यात आली. महिला हिंसाचार, धर्माधता, जातीवाद, ONGC खाजगीकरण, पेट्रोल डिझेल दरवाढ, विमानतळ खासगीकरण, गोदी मीडिया, पर्यावरण विरोधी कायदे, शेतकरी विरोधी कृषि कायदे, बेरोजगारी, उद्योगपतींना कर माफी, कामगार विरोधी कायदे, GST, BSNL खासगीकरण, गॅस दरवाढ या सर्वांची प्रतीकात्मक पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते होळी दहन करण्यात आली. या प्रसंगी अभय छाजेड, मोहन जोशी, कमल व्यवहारे, नीता रजपूत, अशोक राठी, नीरज जैन व लोकायत कार्यकर्ते उपस्थित होते.