पुणे-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भिसे चेंबर्स,औंधरोड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजप पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. भाजप पुणे शहर, कॅटलिस्ट फाउंडेशन तसेच दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी या समाजपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश खूप मोठा असल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची गरज लक्षात घेऊन, दैनिक लोकमतच्या वतीने स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त रक्तदान शिबीरांचे महाराष्ट्रभर आयोजन होत असल्याने त्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे समाजात गरज असणाऱ्या लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप सातत्याने उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त कॅटलिस्ट फाउंडेशनने हा लोकोपयोगी उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांनी कॅटलिस्ट फाउंडेशनचे अभिनंदन केले. यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे,स्विकृत सदस्य वसंत जुनवणे, ज्येष्ठ नेते रमेश नाईक, अनिल भिसे, सोनाली भोसले प्रसिध्दप्रमुख महिला आघाडी, सुप्रिया खैरणार उपाध्यक्ष महिला आघाडी, रेखा चौंधे सरचिटणीस महिला आघाडी, आनंद छाजेड सरचिटणीस मतदार संघ, सुप्रीम चौंधे चिटणीस युवा मोर्चा पुणे शहर, संकेत कांबळे SC आघाडी उपाध्यक्ष, सौरभ कुंडलिक उपाध्यक्ष युवा मोर्चा पुणे शहर, चंद्रशेखर पिल्ले, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर तडाखे, रोहित भिसे सरचिटणीस युवा मोर्चा , तुषार मोहिते, हिमांशू मुथय्या, लोकमतचे मार्केटिंग एक्झुकेटिव्ह विवेक दुधमांडे, तसेच लोकमतचे औंध- बाणेर प्रतिनिधी रामदास दातार, समीर भुते, मिलिंद मोरे, सुनील दैठणकर, संतोष भिसे, विनोद नाईक, राजू भिंगारे, आनंद माने, अनिल माने, प्रवुतिक वाघमारे, केतन गायकवाड, नितीन गायकवाड, संदीप चौरे, रोहित लोखंडे, प्रतिक वाघमारे,वेदांत माने,आशीत माने उपस्थित होते.