देवाने मला सुखी ठेवले – सत्कार प्रसंगी श्रीमती रोशन चांद सैयद यांच्या भावना..
पुणे- भारतीय जनता पार्टी साठी संसद हेच मंदिर असून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचा विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी केले. आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली,त्याप्रीत्यर्थ भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी पौड फाट्यावरील दशभुजा गणपती मंदिरात गेली तीस वर्षे हार,फूल,नारळ,तेल व पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या श्रीमती रोशन चांद सैय्यद यांच्या सत्काराचे आयोजन केले होते,त्यावेळी बोलताना श्री गोगावले यांनी भाजप सरकारच्या काळातील योजनांचा सामान्य नागरिकांना कसा फायदा झाला याचा गौरवपूर्ण उल्लेख केला,
संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले कि मा नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सर्वधर्मीयांमधील सौहार्द वाढले असून सामान्य मुस्लीम भगिनी श्रीमती रोशन चांद सैय्यद ह्या याचे प्रतीक आहेत ,६५ वर्षीय श्रीमती सैय्यद ह्या गेली ३० वर्षे दशभुजा गणपती मंदिरात पूजेचे साहित्य विक्री करत असून त्यांची गणराया वरची श्रद्धा स्पृहणीय आहे .श्रीमती रोशन चांद सैय्यद सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या ” मला व माझ्या कुटुंबाला या देवाने सुखी ठेवले आहे,हा पावणारा देव आहे,येथे सायकल वर येणारी मंडळी आज चार चाकीत दिसतात,अनेकांच्या प्रगतीची मी साक्षीदार आहे,या देवामुळे माझी मुले मी आम्ही सर्व आनंदात असून मला इथे येणाऱ्या भाविकांचे प्रेम मिळाले आहे .”
श्री योगेश गोगावले ,सौ मंजुश्री खर्डेकर आणि देवदेवेश्वर संस्थांचे विश्वस्त रमेश भागवत यांच्या हस्ते श्रीमती सैय्यद यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी भाजप कोथरूड मंडळ अध्यक्ष प्रकाश बालवडकर,जगन्नाथ कुलकर्णी,माजी नगरसेवक दिलीप उंबरकर,सरचिटणीस कुलदीप सावळेकर,रामदास गावडे,दिलीप पासलकर,अनुराधा एडके,माणिकताई दीक्षित,उल्का मोकासदार,संगीता आदवडे,अरुण साकळे,गिरीश खत्री,भारत कदम,योगेश राजापूरकर,असरार शेख,पंडित ओव्हाळ,पांडूरंग कुलकर्णी,सतीश गायकवाड,चरणजीतसिंग सहानी,बाळासाहेब म्होकर,राज तांबोळी,नाना पाटील,व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांनी प्रस्तीविक सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत तर रमेश भागवत यांनी आभार प्रदर्शन केले.