पुणे- शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून पुण्यातील पत्रकार सुनील माने यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली आहे. आज त्यांनी त्यासाठी मुलाखत दिली मुलाखतीला जाण्यापूर्वी माय मराठी कडे भावना व्यक्त करताना माने म्हणाले कि , शिवाजीनगर ला सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन पूर्वक कामाची नितांत आवश्यक्यता आहे .आणि माझ्या आजवरच्या अभ्यासपूर्ण कारकीर्दीचा त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाला उपयोग करून देण्यासाठी प्रयत्शील राहिलो आहे .आता मी यात सक्रीय सहभाग घेवू इच्छितो मला विश्वास आहे मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी येथे योग्य व्यवस्थापनाच्या बळावर सुयोग्य नियोजन करून विकास कामे घडवून आणू शकेल आणि म्हणूनच मी इथे इच्छुक म्हणून दाखल झालो आहे ,बाकी पक्ष घेईल तो निर्णय ….