राष्ट्रवादी आणि काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन पुण्यात सत्ता मिळवली -पूनम महाजन

Date:

पुणे- ‘मागील १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र या दोन्ही पक्षांनी पुण्याचा कोणत्याही प्रकारे विकास केला नाही,’ .शहरात पुष्काळ वेळा घड्याळे फिरली, हात फिरले, आता पुणे महापालिकेत कमळ फुलले पाहिजे, अशा शब्दांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनम महाजन यांची निवड झाली. त्याबद्दल युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य सुशांत शुक्‍ला, जिल्हाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, पुणे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह अन्य जिल्ह्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पुणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. पुण्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. यासोबतच पीएमआरडीएचा प्रश्नदेखील अवघ्या अडीच वर्षांमध्ये मार्गी लावला,’ असे पूनम महाजन यांनी त्यांच्या भाषणात म्हटले. यावेळी राज्यातील आधीच्या सत्ताधाऱ्यांवर महाजन यांनी शरसंधान साधले. ‘आघाडी सरकारच्या काळात श्रेय घेण्यावरुन कोणतेही प्रश्न मार्गी लावले गेले नाहीत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फक्त खोटी आश्वासने देत महापालिकेत सत्ता मिळवली. आता आगामी महापालिकेत कमळच फुलले पाहिजे,’ असे आवाहन यावेळी पूनम महाजन यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

‘देशात परिवर्तन करण्याचे काम पुणे शहराने केले असून ज्या ज्या वेळेस केंद्रात भाजप ची सत्ता आली, त्यावेळी पुण्यात भाजपचे खासदार होते,’ असेही पूनम महाजन यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘देशातील जनतेने कॉग्रेसला एक हाती सत्ता दिली असतानाही त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रगती केली नाही. आता मोदीच्या हातामध्ये सत्ता असल्याने देश बदलत आहे,’ असे या कार्यक्रमात बापट यांनी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ...

स्मार्ट मीटरबाबत पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती

७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमधील १ लाख ६६ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट संवाद पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडलातील विविध मंडलांचे अधिकारी व कर्मचारी दररोज विविध गृहनिर्माण सोसायट्या, निवासी परिसर आणि ग्राहकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देत आहेत. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे. पुणे परिमंडलात जुलै महिन्यात तब्बल ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १,२७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरविषयी माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुणे शहरात दोन ‘एलईडी व्हॅन’ गर्दीच्या ठिकाणी फिरत असून, त्याद्वारे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती व फायद्यांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवून ग्राहकांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट मीटरचे प्रमुख फायदे दिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...