Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विरोधकांनी कर्जमाफीचे राजकारण करू नये – किरीट सोमय्या

Date:

पुणे-शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांना सक्षम करणे हा भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट उद्देश आहे. त्यामुळे संघर्ष यात्रा काढणाऱ्यांनीच यापूर्वी एकदा कर्जमाफी केली होती. त्याचा फायदा किती झाला, शेतकरी किती सक्षम झाला यासारखे प्रश्न आजही उपस्थित होतात. त्यामुळे विरोधकांनी कर्जमाफीला अवजार बनवत राजकारण करू नये, असे मत खासदार किरीट सोमय्या यांनी मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 6 ते 14 एप्रिल या कालावधीत भारतीय जनता पार्टीने एक अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्त 24 खासदारांचे एक पथक महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते पुण्यात आले असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे आणि शहरअध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने सरकार अभ्यास करत आहे. कर्जमाफी हा सुद्धा त्या अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पाऊले उचलने गरजेचे आहे याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे यावर्षातच काहीतरी ठोस निर्णय लवकरच घेण्यात येईल. नोटबंदीच्या काळात काळ्याचे पांढरे पैसे करणाऱ्या तब्बल 80 हजाराहून अधिक कंपन्यांविरोधात मोदी सरकारने पाऊले उचलली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून 25 ते 50 हजार कोटींची रक्कम वसूल केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय कौतुकास पात्र आहे. केजरीवालाचा आप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे सांगत दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....