दोन प्रेमींना आपले प्रेम लग्नापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, लग्नानंतर त्यांचे नाते टिकले नाही तर मनाला धसकाच बसतो. विवाहच्या अगोदर प्रत्येक प्रेमी युगल भावी आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार असतात. एकमेकांकडून विशेष काही अपेक्षाही नसतात. परंतु, लग्नानंतर त्याच जबाबदाऱ्या पार पाडण्यावरून वाद निर्माण होतात. आणि संसार त्रासाचा होतो . त्यात मुलं असतील तर ते जोडपे अडकून जाते . त्यातील एक सावरण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा तेवढ्याच जोराने तोडण्याचा आणि या अश्या नात्यात एक नवीन व्यक्ती येते जी सावरणाऱ्याच्या बाजूने असते आणि मग सुरु होतो खोट्या समाजाला सांभाळत , स्वतःच मन मारत खोटे जगण्याचा खटाटोप . प्रेम हे ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे ” सखी ” . ही कथा आहे नुपूर आणि प्रतीम या नवरा बायको आणि तीची शिल्पाची … आयुष्यात प्रत्येक वेळी “ती” ही वाईट असतेच असं नाही तर ती कधी कधी आपली “सखी ” ही असू शकते . येत्या सोमवारी १७ एप्रिल आणि मंगळवार १८ एप्रिलला रात्री ९ वाजता , आपल्याला मुग्धा चाफेकर आणि सौरभ गोखले यांचे एक अबोल प्रेम झी युवावर पाहायला मिळेल.
प्रतिम आणि नुपूर यांचा पहिला प्रेमविवाह आणि लगेच आर्यन सारखं गोंडस बाळ झाल्यानंतर मात्र नुपूर ला या संसाराचा कंटाळा आला , तर प्रतिम मात्र संसार टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागला . पण नुपूरला या गोष्टीशी काहीमात्र पर्वा नव्हती . उलट तिला तिचा नवरा बोर वाटू लागला होता . आणि ती तीच सुख बाहेर शोधू लागली होती . प्रतिम ला हे सगळं समजतं होत पण आर्यन साठी तो मात्र सहन करत होता . याच काळात शिल्पा एक हुशार समंजस आणि साधी मुलगी बेबीसिटर म्हणून प्रतीम च्या घरात आली आणि तिने आर्यन ला आणि हळूहळू प्रतिम ला आपलंस केलं .प्रतिम ला एक सखी मिळाली होती . पण हे सगळं कसं आणि किती वेळ सुरु राहील .. प्रतिम आणि नुपूरच्या नात्याचं काय होईल .. प्रतिम आणि शिल्पा एकमेकांना सांगू शकतील का की ते एकमेकांवर प्रेम करत आहेत .समाज हे मान्य करेल का ? …. ह्या सर्व प्रश्नाची उत्तर समजून घ्यायची असतील तर झी युवावर , प्रेम हे ची “सखी ” ही प्रेम कथा पहावीच लागेल.
“सखी ” ही झी युवाची संकल्पना असून मुग्धा चाफेकर आणि सौरभ गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत, सारा श्रवण ही नुपूर च्या भूमिकेत आहे . तेजस तुंगार यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे . दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून “प्रेम हे” झी युवावर उलगडत जाईल.