डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युनायटेड नेशन्स मध्येही होणार साजरी.

Date:

आयोजनामध्ये युनायटेड नेशन्स प्रथमच सहभागी होणार, जगातील सर्वच देश सहभागी

 जालन्याचा मराठी सुपुत्र दिलीप म्हस्के यांच्या प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर भारतासाठी सर्वोच्च अभिमानाचा क्षण.

युनायटेड नेशन्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजन समिती सदस्य एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची माहिती.

 

न्युयोर्क( अमेरिका): भारताचे सुपुत्र विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही युनायटेड नेशन्स मध्ये साजरी होणार असून यावर्षी प्रथमच युनायटेड नेशन्स संयुक्तरित्या या आयोजनामध्ये सहभागी होणार आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप म्हस्के हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या “फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरीझन” या संस्थेने हे ऐतिहासिक पाऊल उचलले असून हि संस्था युनायटेड नेशन्स ECOSOC मेंबर आहे. या ऐतिहासिक जयंती सोहळ्याला युनायटेड नेशन्सचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमिना जे. मोहम्मद , ‘आय.बी. एम.’ चे जनरल मेंनेंजर डॉ. जुलिया ग्लीडेन, गुगल चे क्रीएटिव्ह हेड ऑलिव्हर राबेन्स्चाग, हिटलॅब चे चेअरमन प्रोफ.स्टेन काचोन्वास्की, ‘ऑफिस ऑफ प्रोवोस्ट’ चे केथ्रीन न्यूमन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अमेरिकेचे हेड पद्मजा चंद्रु व ‘द इंडिया नेटवर्क’ चे राहुल नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत. या जयंती निमित्त “इंपॉवरिंग पिपल थ्रु डिजिटल टेक्नोलॉजी फॉर सोशल अॅण्ड फायनान्स इलुजन” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन होणार आहे. या जयंतीचे आयोजन युनायटेड नेशन्स च्या मुख्यालयात अमेरिकन प्रमाणवेळेनुसार १३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत व भारतीय दुतावासात १४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत होणार आहे.अशी माहिती आनंद बनसोडे यांनी प्रसिद्धीसाठी पाठविली आहे .

गेल्या वर्षी युनायटेड नेशन्स च्या मुख्यालयात साजऱ्या झालेल्या जयंतीमध्ये युनायटेड नेशन्स सहभागी नव्हती पण या वर्षी युनायटेड नेशन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित होवून जयंतीमध्ये संयुक्तिकरीत्या सहभागी होणार आहे. मुळचे जालन्याचे सुपुत्र असलेले दिलीप म्हस्के यावेळेस “डोनाल्ड ट्रुम्प” यांच्या शपथविधीस त्यांना विशेष निमंत्रण होते.  गेल्या वर्षी व या वर्षी यांच्याच पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती युनायटेड नेशन्स मध्ये साजरी केली गेली होती.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे मार्च २०१७ मध्ये युनायटेड नेशन्स च्या मुख्यालयातील निमंत्रणावरून तिथे गेला असता दिलीप म्हस्के व आनंद बनसोडे यांची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा जगाच्या सर्वोच्च शिखरांवर घेवून गेल्यामुळे यापुढे दरवर्षी युनायटेड नेशन्स मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजन समिती चा सदस्य होण्याबाबत दिलीप म्हस्के यांनी आनंदला सुचवले.

“दिलीप म्हस्के यांच्या पुढाकाराने इथून पुढे दरवर्षी अमेरिकेतील युनायटेड नेशन्समध्ये होणाऱ्या जयंतीसाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांना अमेरिकेत बोलावण्याचे काम आम्ही करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय इतरही महापुरुषांचे कार्य जगापुढे आणून त्यांची जयंती युनायटेड नेशन्स मध्ये साजरी करण्यास प्रयत्न करणार” असे एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे म्हणाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...