पुणे- महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपद सलग तिसऱ्यांदा भाजपने नगरसेवक हेमंत रासने यांना बहाल करून त्यांचा एकप्रकारे गौरव केला आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव यांच्याकडे दाखल केला .
यावेळी बोलताना रासने म्हणाले,’ सलग तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यासर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज आज दुपारी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, . महापौर मुरलीआण्णा मोहोळ, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले,अजय खेडेकर, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे, सौ. मंजुश्री खर्डेकर, सौ. मानसी देशपांडे, सौ. वर्षा तापकीर व इतर सहकारी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. .स्थायी समिती अध्यक्षांची निवड शुक्रवार दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुणे मनपा भवन (नवीन इमारत) येथे होणार आहे.