लहानग्यांच्या वाढदिवसाची रक्कम पोलीस वेल्फेअर फंडास
पुणे-कोरेगाव घोरपडी भागातल्या भाजप नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या दोन्ही म्हणजे ७ वर्षे वयाच्या आरुष आणि २ वर्षे वयाच्या आर्निक या दोघांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम टाळून या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम रुपये १ लाख हि पोलीस वेल्फेअर फंडास देण्यात आली आहे. आपल्या मुलांनीच याबाबत निर्णय घेतला आणि आपण त्याची सत्वर अंमलबजावणी केली असे गायकवाड यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सदरचा निधी चा धनादेश पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्याकडे देऊन ती रक्कम जमा केली आहे. असेही ते म्हणाले .कालच्या दि.२७ एप्रिल रोजी चि.आर्णिकचा वाढ दिवस होता तर दि.१४ मे रोजी चि.आरुषचा वाढदिवस आहे.
आरुष व आर्णिक यांच्याकडून व्हिडीओ संदेश त्यांनी पाठविला आहे.