मुंबई . ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर कपूर यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आलिया भट, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, अनिल अंबानी, रिमा जैन, आदर जैन यावेळी उपस्थित होते. ब-याच काळापासून कर्करोगाशी झुंज देणारे ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी 8:45 वाजता मुंबईत निधन झाले. अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी नीतू सिंग आणि मुलगा रणवीर उपस्थित होता. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी ऋषी यांनी रणबीरला त्यांच्याजवळ बेडवर बसण्यास सांगितले होते. त्यांची थोरली मुलगी रिद्धिमा कपूर साहनी दिल्लीला असते, तिला मुंबईला जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. खासगी विमानाने संध्याकाळी रिद्धिमा दिल्लीहून मुंबईत पोहोचणार आहे.