” आंबेडकर भवन चा लढा पॅंथर लढणार ” – बाप्पुसाहेब भोसले

Date:

पुणे-
“दादर येथील डॉ . आंबेडकर भवन येथील ऐतिहासिक डॉ . आंबेडकरांची प्रेस काही गुंड समाज कंटकांनी उध्वस्त केली त्याचा धिक्कार करण्यासाठी आज पुणे शहरात सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले , या आंदोलनास मा . बाप्पुसाहेब भोसले संस्थपाक राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया यांनी सामील होत जाहीर पाठींबा दिला , यावेळेस भोसले यांनी पॅंथर ची निर्भीड तोफ डागत आंबेडकरी द्वेष्टनचा खरपूस समाचार घेतला ,  पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय विधान भवन पुणे यथे भर पावसात बाप्पुसाहेब भोसले यांनी राज्य सरकार व प्रशासनास जाब विचारात सांगितले की ” हिम्मत असेल तर समोर येऊन लढा , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण वस्तू म्हणजे डॉ . आंबेडकर प्रिंटिंग प्रेस होती ती आमच्या प्रेरणा स्थान आहे यामुळे सर्वत्र दलित बांधवांमध्ये शोकांतिका पसरली असून आता याचा उद्रेक होणार व प्रेस पाडण्याचे षडयंत्र करणारे रत्नाकर गायकवाड व राज्य सरकार यास जवाबदार असतील, त्यानच्यावर त्वरित कार्यवाही व्हावी ”  . ” बाबासाहेबाच्या घरावर हल्ला करणारे धूर्त लोक ना मर्द असून हे कृत्य निंदनीय आहे याचा आम्ही धिक्कार करत पॅंथर आता रस्त्यावर उतरला आहे , याचा बदला आंबेडकरी जनता घेणार हे जाहीर केले ” उगार मूठ हो एक जुठ ” सर्व पक्ष संघटना यांनी एकत्र येत हा लढा देण्यासाठी राज्यव्यपी आंदोलन आम्ही करणार आहोत ” असे भोसले यांनी जाहीर केले . ”
या वेळेस युवराज बनसोडे – रिप सेना , विवेक बनसोडे , दलित कोब्रा चे भाई विवेक चव्हाण ,अॅड. भारत शिंदे यांची भाषण झाले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...