पुणे-कोरोना आजाराचा शहरात प्रादुर्भाव वाढत असल्याने आठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील भाग ‘सील’ करण्यात आले आहेत. तरीही या भागात रुग्ण वाढत असून यामुळे पुणे पोलिसांनी या भागातल्या बँकांसाठी नियमावली तयार केली असून, काही बँका बंद राहणार असून, काहींना वेळांचे बंधन घालण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी हे आदेश काढले आहेत
अशी असेल बँकांसाठी नियमावली :
– कोरोना प्रतिबंधित परिसरातील सर्व बँका बंद राहतील, मात्र सर्व बँकाचे एटीएम केंद्र पूर्णपणे कार्यान्वित असतील.
– अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदानाच्या वितरण संबंधित बँकांच्या शाखा विहित काळात चालू ठेवता येतील.
– त्यासाठी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी समन्वय साधून अशा बँका व त्यांच्या शाखा निश्चित कराव्यात.
– सदर बँकांच्या ग्राहकांसाठी सकाळ 10 ते दुपारी एक पर्यंत तसेच अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी दुपारी एक ते चार पर्यंत चालू ठेवता येईल.
– उपलब्ध मनुष्यबळाच्या चाळीस टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकतील.
– बँक प्रशासनाने कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या आदेशाची प्रत द्यावी.
– संक्रमण क्षेत्रातील मनाई आदेशांतर्गत कर्तव्यावर हजर राहणारे अधिकारी-कर्मचारी हे शक्यतो त्याच क्षेत्रातील वास्तव्यास असणारे असावेत.
– बँक परिसरात ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी बँकांनी खाजगी व मान्यताप्राप्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी.
सील करण्यात आलेली ठिकाणी :
प्रायव्हेट रोड पत्रा चाळ, लिंक क्रमांक 48 , ताडीवाला रोड प्रभाग क्रमांक 20, संपूर्ण ताडीवाला रोड, विकास नगर, बालाजी नगर श्रावस्ती नगर प्रभाग क्रमांक दोन, घोरपडी गाव, राजेवाडी, पदमाजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, एडी कॅप चौक,कॉटर गेट, भवानी पेठ प्रभाग क्रमांक 20 , विकास नगर, वानवडी, ताडीवाला रोड, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड प्रभाग क्रमांक 26, 28 घोरपडी गाव, संपूर्ण लक्ष्मी नगर, रामनगर, जय जवान नगर, येरवडा प्रभाग क्रमांक 8, मोहम्मद वाडी, हडपसर प्रभाग क्रमांक 23, 24 व 26 पर्वती दर्शन, सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टँड, पटेल टाइल्स, विक्रम टाइल, ईराणी वस्ती, संपूर्ण पाटील। इस्टेट परिसर, संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्रमांक सात, एन आयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्रमांक 24 परिसर, साई नगर, वडगाव शेरी परिसर प्रभाग क्रमांक पाच, धानोरी प्रभाग क्रमांक एक, येरवडा प्रभाग क्रमांक सहा.