चंडीगड :
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणाºया बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १0 वर्षे याप्रमाणे एकूण २0 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३0 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी १४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी १0 वर्षे शिक्षा झाली असल्याने, बाबाला तब्बल २0 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. शिक्षा सुनावल्यावर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले, तेव्हा त्याचे भरजरी कपडे काढून तुरुंगातील वेश घालण्यासाठी दिला गेला.
गुरमीत राम रहीम समाजसेवक असून, त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. त्यांनी रक्तदान आणि स्वच्छता अभियान अशी समाजपयोगी कामे केली आहेत, असे त्याच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. तर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीवर राम रहीमकडून तीन वर्षे बलात्कार करण्यात आला. 45 अजून पीडित असून, त्या समोर आल्या नाहीत, असे सीबीआयने सांगितले होते. अखेर न्यायालयाने आज या बाबाला शिक्षा सुनावली.शिक्षा सुनावताच मला माफी द्या म्हणत या बाबा ला रडू कोसळले.
साध्वींवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला तुरुंगातच स्थापन केलेल्या न्यायालय कक्षात दहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली.
दरम्यान डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या सुरक्षा पथकातील सात जणांविरुद्ध पंचकुला पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पैकी पाच जण हरियाना पोलिसचे कर्मचारी आहेत. त्यातील तीन कमांडो आणि दोघे जॅमर वाहनाचे कर्मचारी होत. उर्वरित दोघे हे खासगी सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी होते. त्यांच्याकडून शस्त्रेदेखील जप्त केली आहेत. पंचकुलाचे पोलिस आयुक्त ए. एस. चावला म्हणाले, की या सुरक्षारक्षकांनी कोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षांपासून झेड सुरक्षा पथकातील असून, कालांतराने ते डेरा सच्चा सौदाचे समर्थक बनले.