Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अरुण नलावडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Date:

दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावं ही महत्वाकांक्षा प्रत्येक रंगकर्मीला असतेच. खूप कमी जण या स्वप्नांचा पाठलाग करीत ‘कॅप्टन ऑफ द शिप’ होतात. नाटक, मालिका व चित्रपट अशा तीनही माध्यमांत लिलया वावर असणारे हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केवळ अभिनयापुरते सीमित न राहता दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाचा अनोखा पैलू ‘शरयु आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ताटवाया आगामी मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अरुण नलावडे ताटवा चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत यात शिल्पकाराची वेगळी भूमिका साकारताहेत; त्यामुळे ते प्रेक्षकांना अभिनेता व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसतील.

डॉ. शरयु पाझारे निर्मित ताटवा या चित्रपटाची कथा समाजातील विषमतेवर भाष्य करीत, पाथरवट समाजातील होतकरू मुलीचा जीवनप्रवास रेखाटणारी आहे. या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पकाराच्या भूमिकेत अरुणजी दिसतील. संजय शेजवळ व गौरी कोंगे ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करतेय. अरुण नलावडे यांनी चित्रपटाविषयी आपले मनोगत मांडले कि, सुरुवातीला मी या चित्रपटात फक्त अभिनय करणार होतो; परंतु निर्मात्या डॉ. शरयु पाझारे यांनी, ‘तुम्हीच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार का?’ असे विचारले. विषयात नाविन्य असल्याने मी ताटवाचे दिग्दर्शन करण्यास होकार दिला. ‘ताटवा’ म्हणजे कुंपण भेदून जाणे’, शीर्षकाप्रमाणे या चित्रपटात पाथरवट समाजातील मुलगी तिच्या हुशारीने पुढे जात समाजासाठी आदर्श निर्माण करते. मनाशी ठरवलं तर एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते असा प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. ताटवा चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे अनेक स्थानिक कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनाचा अनुभव खूप छान होता, अशा शब्दात अरुण नलावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्यक्तीरेखा छोटी असो वा मोठी, भूमिकेत वेगळेपण आणून ती लक्षवेधी करण्यात अरुणजींची ख्याती आहे. आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अरुण नलावडे यांच्या दिग्दर्शकीय भूमिकेचे प्रेक्षक नक्की स्वागत करतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...