वाडेबोलाईमध्ये 10 कृषिपंपधारक थकबाकीमुक्त

Date:

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2021: कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत कृषी ग्राहकांसाठी वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हवेली तालुक्यातील वाडेबोलाईचे सरपंच श्री. दीपक गावडे यांच्यासह पाच शेतकऱ्यांनी 10 कृषिपंपांची चालू बिल व मूळ थकबाकीचे बुधवारी (दि. 3) 7 लाख 18 हजार रुपये महावितरणकडे भरले व थकबाकीमुक्ती मिळविली. धोरणानुसार या सर्वांना एकूण थकबाकीमध्ये तब्बल 9 लाख 35 हजार रुपये सवलत मिळाली आहे.

मुळशी विभाग अंतर्गत सध्या गावोगावी जाऊन कृषी ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये मिळणारी व्याज व विलंब आकाराची सूट तसेच मूळ थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंतची सूट आदींची माहिती देण्यात येत आहे. वाडेबोलाई येथे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमात कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, उपकार्यकारी अभियंता श्री. प्रदीप सुरवसे, सहायक अभियंता श्री. दीपक बाबर व नईम सुतार यांनी थकबाकीमुक्ती योजनेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी सरपंच दिपक गावडे तसेच गुलाब पायगुडे, प्रकाश पराड, पुंडलिक पायगुडे, मालन पायगुडे यांनी त्यांच्या 10 कृषिपंपांच्या वीजजोडण्यांची थकबाकी व चालू बिल असा एकूण 8 लाख 30 हजार 514 रुपयांचा भरणा केला. कृषी धोरणानुसार या सर्वांच्या थकीच वीजबिलांतील व्याज, विलंब आकार व मूळ थकबाकीचे 50 टक्के असे एकूण 9 लाख 35 हजार 105 रुपये माफ करण्यात आले आहे. भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतील 33 टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्र व 33 टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

       कृषी ग्राहकांच्या थकीत वीजबिलातील विलंब आकार, व्याज व मूळ थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंत माफी मिळत असल्यामुळे या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...