वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयातील आयएसटीई विद्यार्थी विभागाच्या वतीने स्पार्कटेक २०२० या तीन दिवसीय तांत्रिक महोत्सवा अंतर्गत घेण्यात आलेल्या तांत्रिक स्पर्धांचा व फिट इंडिया अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार श्री. विजयसिंह जेधे व पदाधिकारी श्री.मारोतराव साळुंखे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना खेळामुळे आत्मविश्वास खिलाडूवृत्ती व नेतृत्वगुण विकसित होतात. शरिर व मन सदृढ बनल्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होण्यास मदत होते. सांघिक भावना, नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्य असे गुण विकसित होतात. खेळाबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला देखील प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन केले. यामध्ये क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या व शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना खजिनदार श्री.विजयसिंह जेधे व श्री.मारोतराव साळुंखे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार श्री.विजयसिंह जेधे, श्री.मारोतराव साळुंखे,प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, समन्वयक प्रा.सारंग दुबे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. नवनाथ सरोदे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.पाहिजे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा.संदीप राऊत, प्रा.सारंग दुबे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. नवनाथ सरोदेयांनी केले. तर सूत्र संचालन कु.अमिना मोंडल हिने केले.