संजय जाधव ह्यांची मल्टिस्टारकास्ट ‘लकी’?

Date:

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट.

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेले एक महिना प्रॉडक्शन हाऊसकडून स्टारकास्टची रिविल झाली नव्हती.

फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनुसार, लकीने फिल्म इंडस्ट्रीसह सिनेरसिकांचीही गेले एकमहिना एवढी उत्सुकता ताणून धरली होती. असे फक्त बॉलीवूड सिनेमांबाबतच होते. गेला एक महिना ह्या सिनेमाची स्टारकास्ट कोण असेल? ह्याविषयी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती. आणि मग अचानक सोशल मीडियावर एकामागून एक ए-लिस्टर सेलेब्सचे पोस्ट पाहायला मिळाले.

पहिल्यांदा उमेश कामत, मग सिध्दार्थ जाधव, त्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा ए-लिस्टर मराठी सेलेब्सनी तेच ‘लकी’ असल्याचं म्हटलं.

सूत्रांनुसार, एवढी तगडी स्टारकास्ट एका सिनेमात पाहायला मिळणं हा तर दुग्धशर्करा योग. आणि एवढ्या कलाकारांना एका सिनेमात आणणं फक्त संजय जाधवच करू शकतात. असा मल्टिस्टारर सिनेमा पाहणं, ही तर सिनेरसिकांसाठी पर्वणीच असेल. रोज ह्या सिनेमाविषयी फिल्मइंडस्ट्रीतले एक-एक मोठमोठे सेलेब्स ते लकी असल्याचे सोशल मीडियाव्दारे सांगत आहेत.

लकीच्या स्टारकास्टची अनाउन्समेन्ट ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ लवकरच 7 सप्टेंबरला करणार आहे. पण तोपर्यंत ह्या बिगबजेट आणि मोस्ट अवेटेड सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अजून कोण कोण सामिल होते आहे. ते सोशल मीडियावरून कळेलच.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला तब्बल 55 लाखांचा घातला गंडा

कल्याण- कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे...

इराणनंतर ओमानलाही ट्रम्प यांची धमकी:म्हटले- होर्मुझवर कुणाचा कंट्रोल सहन करणार नाही, उडवून देऊ, मला निवडणुकांची काळजी नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,...

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या अखिल काटकरचा सत्कार – संदीप खर्डेकर.

पुणे-गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये...

विकसित भारतासाठी कर्मयोगाचा सिद्धांत समजणे आवश्यक : अविनाश धर्माधिकारी

‘विकसित भारत’ संकल्पनेवर पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा स्थापना दिन साजरा पुणे :...