पुणे- भाजपच्या नगरसेविका राणी भोसले यांच्या प्रयत्नातून बिबवेवाडीतील चिंतामणराव देशमुख शाळेत आज पासून कोरोन प्रतिबंधक लसीकरण केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. भाजपचे आमदार भीमराव तापकीर ,नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, रायबा भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . राज्य सरकार चे प्रयत्न कोरोना ला अटकाव करण्यासाठी अपुरे पडत असताना सर्वांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले . आपल्या प्रभागात कोव्हिड केअर सेंटर देखील आपणास सुरु करायचे आहे. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या लसीकरण केंद्रासाठी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची मदत झाल्याचे राणी भोसले यांनी सांगितले.