मुंबई-शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर इडीने कारवाई सुरु केली असून याप्रकरणात तब्बल 10.20 कोटींची संपत्ती इडीने (तात्पुरती) जप्त केली. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.अंदाजे 42 गुंटा मोजून गट क्रमांक 446, मुरुड,दापोली, रत्नागिरी, ₹ 2,73,91,000 किमतीचे आणि साई रिसॉर्ट NX चे रिसॉर्ट सदर जमिनीची किंमत ₹ 7,46,47,000
इडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
इडीच्या प्रेसरिलीजमध्ये स्पष्ट करण्यात आले की, ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. या प्रकरणी मुरुड दापोली येथील 42 गुंठे जमीन व साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.