आतापर्यंत देशातील 4,34,917 रजिस्टर्ड कंपन्यांपैकी फक्त 38,030 कंपन्यांना DPIIT, Gov. of India यांच्याकडून मान्यता
– साहसी पर्यटन, आउटडोअर एज्युकेशन, स्पेस टुरिझम यामधील युनिक बिजनेस आयडियासाठी मिळाला दर्जा.
सोलापूर: आपल्या प्रत्येक कामगिरीने सोलापूरकरांना अभिमानाचे क्षण देणाऱ्या आनंद बनसोडे याने उद्योग क्षेत्रातही आपला पाया रोवला असून नुकताच 360 एक्सप्लोरर या त्यांच्या कंपनीला ‘डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड इंटरनल ट्रेड, भारत सरकार’ मार्फत “स्टार्ट-अप” चा दर्जा देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशातील 4,34,917 रजिस्टर्ड स्टार्ट-अप पैकी फक्त 38,030 कंपन्यांना DPIIT, Gov. of India यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. यात एखादा बिजनेसची आयडिया ओरिजनल आहे का? बिजनेस इतर सर्वांपेक्षा वेगळा व वाढ होणारा आहे का? याची पडताळणी करूनच अशी मान्यता देण्यात येते.
2017 पासून साहसी क्षेत्रात काम करत असलेल्या 360 एक्सप्लोरर ने आतापर्यंत सह्याद्री पासून वेगवेगळ्या खंडात मोहिमा आयोजित केलेल्या आहेत. शिवाय 2019 मध्ये रशियन स्पेस टूर कंपनीसोबत भविष्यात अवकाश मोहिमा व त्याबद्दल विविध शैक्षणिक टूर्स आयोजित करण्याचा करार केलेला आहे. विश्वविक्रमी मोहिमा, स्पेस टुरिझम, वेगळे शैक्षणिक स्ट्रक्चर असलेले 360स्कुल या सर्व बिजनेस आयडियासाठी 360 एक्सप्लोरर ला असा दर्जा मिळाला आहे.
स्टार्ट- अप चा दर्जा मिळवणे ही खूप मोठी बाब समजली जात असून विविध सरकारी योजनांचा फायदा मिळवता येतो. शिवाय बिजनेस वाढीसाठी इनक्युबेशन सेंटर मार्फत मदतही घेता येते. “स्टार्ट-अप” चा दर्जा मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून 360 एक्सप्लोरर चे कौतुक होत आहे.
आनंद बनसोडे
फिजिक्स सारख्या विषयात MSc, M.phil, PhD पर्यंतच्या शिक्षणाचा, लहानपणापासून असलेल्या स्पेस व साहसी टुरिझमच्या आकर्षणाचा अनुभवाचे डॉट्स कनेक्ट करत 360 एक्सप्लोरर ही कंपनी उभी केली आहे. ही फक्त सुरवात आहे अजून खूप काही करावयाचे आहे.