पुणे-
27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी राज्यभाषा दिन संपूर्ण विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. आपल्या भागातील नगर सेविका सौ अश्विनीताई नितीन कदम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अक्षर बागेत मी पुणेकर या स्वयम् चित्र कट्ट्याचे (सेल्फी पॉइंट) लोकार्पण आज करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर ,प्रा. चित्रकार अनंत ढेरे , श्री नितीनभैय्या कदम- (पर्वती अध्यक्ष) , श्री सुनील बोरवलेसर, अमोल ननावरे, तुषार नांदे, रुषिकेश भुजबळ,सचिन जमदाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपली भाषा …आपली अस्मिता असा शुभेच्छा फलक नागरिकांसाठी लावण्यात आला होता . तसेच लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मराठीतून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर वळणदार हस्ताक्षर कसे असावे असे प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात आले होते. मराठीतून बालगीते , मराठीतून पात्र वाक्य बोला , मराठी म्हणी व वाक्यप्रचार लिहा,मराठी कवी,लेखक नावे सांगा, मराठी चित्रपटांची नावे सांगा, एक मिनिटात जास्तीत जास्त अक्षरे जोडा,अक्षरांची गाडी,अक्षरांचे झाड असे विविध खेळांचे आनंद परिसरातील लहान मुलांनी व नागरिकांनी घेतला. विजेत्यांना मराठी शब्दकोष व मराठी पुस्तके बक्षिश म्हणुन देण्यात आले.