आम्हीही निवडून आलोत -भाजपमधील लॉबीविरोधात मोठा गट नाराज
पुणे- भाजपची पुणे महापालिकेत एकहाथी सत्ता असताना भाजपमधील लॉबी नावाच्या प्रकाराने असंख्य नगरसेवक नाराज आहेत . हि नाराजी आता फुटीच्या उंबरठ्यावर कधीही येवू शकते असा अखेरच्या २ वर्षाचा काल आता सुरु झाला आहे. २ वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत . आणि पदे वाटताना नेत्यांनी केलेल्या मनमानी पेक्षाहि त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी किंवा भाजपमधील विशिष्ठ गटाने केलेली मनमानी अनेकांच्या वर्मी बसलेली आहे आणि आता तिला उमाळे फुटण्याची वेळ बहुधा येईल असे समीक्षकांना वाटते आहे. ना काकडे , ना बापट .. आता दादा गट जोमात असताना जुने जाणते कार्यकर्ते …मात्र सत्तेत येवून ३ वर्षे उलटली तरी नाराजीच्या कोमातून बाहेर येवू शकलेले नाहीत .
भाजपचे ९८ नगरसेवक पालिकेत आहेत . नवे नवे आलेत,लाटेत आलेत म्हणून ,आणि अन्य पक्षातून आलेत.. म्हणून अनेकाना डावलण्याचे कारस्थान नेत्यांनी आणि पालिकेत बसविलेल्या पदाधिकाऱ्यांनि राबविल्याचा आरोप होतो आहे. प्रत्येक जन स्वताची लॉबी सांभाळून इतरांच्या हातावर अक्षदा ठेवतो आहे.या प्रकाराला वैतागलेले ३० ते ४० नगरसेवक सापडतील अशी स्थिती असताना राजकीय दृष्ट्या त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न मात्र कॉंग्रेस वा राष्ट्रवादीच्या पालिकेतील नेत्यांना करन्याची आवश्यक्यता वाटलेली नाही .राष्ट्रवादीत फारशी वेगळी अवस्था नाही . कॉंग्रेस मध्ये २ च महारथी आहेत. पण राष्ट्रावादित अनेक महारथी आहेत आणि त्यांच्यात आपसातच स्पर्धा आहे. अशा स्थितीत भाजपमधील धुसफूस अजून तरी कोणताही राजकीय रंग प्राप्त करू शकलेली नाही पण येत्या काही काळातच बापट .काकडे आणि पाटील अशा तीन नेत्यांचे ३ गटात समर्थक आणि या शिवाय जुन्या जाणत्या भाजपा कार्यकर्त्यांचा संच अशा ४ गटातून भाजप वाटचाल करीत असताना महापालिकेतील ठराविक गटाची कार्यपधती आणि पक्षाच्या पातळीवरील कार्यपद्धती यातूनच या पक्षाचे पुढील दिवस कसे असतील त्याची रूपरेषा ठरणार आहे यात शंका नाही .