पुणे-स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज भाजपच्या वतीने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुन्हा अध्यक्षपदा साठी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे दाखल केला .महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृहनेते धीरज घाटे,राजेंद्र शिळीमकर ,अमोल बालवडकर ,राजेश येनपुरे आणि पक्षातील अन्य मान्यवर नगरसेवक यावेळी उपस्थित होते . स्थाय समितीत १६ पैकी भाजपचे १० सदस्य असल्याने अध्यक्षपदी भाजपच्याच उमेदवाराची निवड निश्चित असते . गेल्यावेळी सुनील कांबळे आमदार झाल्याने त्यांनी स्थायी च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर उर्वरित अवधी साठी रासने यांना संधी मिळाली .आता नव्याने वर्षभर त्यांना मिळणार आहे.
- अर्ज दाखल केल्यावर काय म्हणाले हेमंत रासने –
पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, संजयजी काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यासर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज आज सकाळी मा. महापौर श्री. मुरलीआण्णा मोहोळ, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, गटनेते श्री.धीरज घाटे, श्री. राजेश येनपुरे, सौ. गायत्री खडके, श्री. दीपक पोटे, सौ. मानसी देशपांडे, सौ. सुनीता गलांडे, श्री. गोपाळ चिंतल, श्री. योगेश समेळ व इतर सहकारी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरण्यात आला.
स्थायी समिती अध्यक्षांची निवड शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुणे मनपा भवन (नवीन इमारत) येथे होणार असून माझ्यावर प्रेम करण्याऱ्या आपण सर्व सहकारी मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे…..!!!!!
- नगरसेवक हेमंत रासने