ताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’

Date:

गुरुपौर्णिमेनिमित्त उद्गारतर्फे
अध्ये यांचाही विशेष सन्मान
पुणे: विद्युत गतीने तबल्यावर थिरकणाऱ्या बोटांतून उमटणारा पं. योगेश शम्सी यांचा सुश्राव्य ताल आणि बेबीताईंच्या कथक कलेचा वारसा विनम्रतेने उलगडणारी आसावरी पाटणकर यांची नृत्यप्रस्तुती, अशा ताल व लयीच्या सुरेख अनुभूतीमुळे टाळ्यांची उत्स्फूर्त दाद रसिकांनी कलाकारांना ‘अर्पण ‘ केली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्गार तर्फे ‘अर्पण’  मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे एकल सादरीकरण झाले. आध्यात्मिक गुरू सुनील काळे, नृत्यभारतीच्या अध्यक्षा सुनीता पुरोहित, प्रसिद्ध गायक पं. उदय भवाळकर, नीलिमा अध्ये, पं सुरेश तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नीलिमा अध्ये यांच्यावरील स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच त्यांचा विशेष सत्कार ही यावेळी झाला.
 कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आसावरी पाटणकर यांची एकल प्रस्तुती झाली. कथक परंपरेनुसार शिव वंदनेनंतर विलंबित तीनताल त्यांनी पेश केला.  पं. मोहनराव कल्याणपूरकर, गुरू पं. रोहिणीताई भाटे अशा गुरू परंपरेतून प्राप्त केलेल्या रचना त्यांनी लीलया सादर केल्या. स्वरचनेतून सादर केलेल्या ठुमरीतून पाटणकर यांनी नृत्य व अभिनयावरील प्रभुत्वाचे विलक्षण दर्शन रसिकांना घडविले. यावेळी त्यांना अर्पिता वैशंपायन (गायन), पं. योगेश शम्सी (तबला), सुनील अवचट (बासरी), देवेंद्र देशपांडे(संवादिनी), नीलिमा अध्ये (पढंत) यांनी समर्पक साथ दिली.
तबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक आणि अनेक बंदिशींमध्ये वापरला जाणारा  प्रसिद्ध असा तीन-ताल पं. योगेश शम्सी यांनी सादर केला. डग्यावर भिंगरीसारखी फिरणारी बोटं आणि त्यातून निघणारा गोड आवाज यामुळे रसिक भारावून गेले. काही कायदे, रेले, आणि पंजाब घराण्याच्या पारंपरिक रचना सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ताल आणि संवादिनीचा लेहरा याचा उत्तम मेळ साधत त्यांनी एकल वादनाची ही मैफल उत्तरोत्तर रंगवली.
सत्काराने जबाबदारी वाढली: 
उद्गारतर्फे झालेल्या सत्काराने निलिमाताई अध्ये अक्षरशः भारावून गेल्या. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,हा सन्मान माझा नसून गुरू बेबीताई आणि गुरू परंपरेचा आहे. हा सत्कार थोपविण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु, मला माझी गुरुभगिनी व गुणी शिष्या आसावरी हिच्या भावनांचा आदर करावा लागला. अजून खूप कार्य  घडणे आपल्या हातून बाकी असल्याची जाणीव या सत्काराने मला करून दिली असून माझ्यावरील जबाबदारी आता वाढली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत स्लीपरसाठी रेल्वेचा ८३९ कोटींचा करार; अमेरिकेच्या वॅबटेक कंपनीला मोठी ऑर्डर!

५० वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी ब्रेक, स्वयंचलित दरवाजे आणि...

पुण्यात भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्न ; रणनीतीचा आढावा होणार?

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपने संघटनात्मक...

नागपूर-पुण्यात भाजपला जोरदार धक्का! विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात

फडणवीस-गडकरींच्या नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी; पुणे पदवीधरमध्ये शरद...