पुणे-शासकीय पातळीवर ,वैद्यकीय पातळीवर कोरोनाशी लढाई सुरु झालेली असताना पुण्यातील विविध पक्षांचे नगरसेवक देखील आता आपापल्या प्रभात हा सामना करताना दिसू लागले आहेत . औंध बाणेर बालेवाडी कोथरूड भागात ज्यांच्याकडे तरुण नेतृत्व म्हणून भाजपा पाहत आलेय ते नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विविध भागात सोडीयम हायफ्लोराईडची फवारणी करणे आणि मास्क वाटप करणे ,यात आपला वेळ घालवून हा सामना सुरु ठेवला आहे. 3000 मास्कचे वाटप करीत त्यांनी सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आणि सुमारे २ हजार लिटर सॅनीटायझर वाटप केले आहे. पहा हा प्रातिनिधिक व्हिडीओ