थ्रिसुर, 28 मार्च 2020 – कल्याण ज्वेलर्सने आज करोना विषाणू- कोविद-19 विरोधात लढा देण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या निधीचे अर्थपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने वाटप व्हावे यासाठी कंपनीने सरकारी व स्थानिक संघटनांशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. या निधीच्या मदतीने समाजातील वंचित घटकांना खाद्यपदार्थ आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा करण्याला आमचे प्राधान्य असेल.
या निर्णयाविषयी कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. एस. कल्याणारामन म्हणाले, ‘कोविड- 19 मुळे तयार झालेल्या परिस्थितीने संपूर्ण जगावर अनपेक्षित परिणाम केला आहे. हा काळ अतिशय आव्हानात्मक असून त्याच्याशी लढा देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. कल्ण ज्वेलर्सला या समस्येच्या गांभीर्याची जाण आहे आणि म्हणूनच कोविड- 19 विरोधातल्या संघर्षासाठी आम्ही 10 कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.’
या निधीचे योग्य प्रकल्पांसाठी प्रभावी वाटप होईल याची खात्री करण्यासाठी कंपनीने विविध स्थानिक आणि सरकारी संघटनांशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. हा निधी प्रामुख्याने या साथीचा फटका बसलेल्या समाजातील वंचित घटकांना खाद्यपदार्थ आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी वापरला जाईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला कल्याण ज्वेलर्सच्या सीएमडींनी सर्व कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सध्या बंद असलेल्या दालनांमुळे पगारात कपात केली जाणार नसल्याचे नमूद केले होते. त्याचबरोबर या पत्रात कंपनीने कल्याण ज्वेलर्सच्या एकंदर व्यवसायावर परिणाम होणार असला, तरी आपल्या सर्व 8000 कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा संपूर्ण पगार देणार असल्याचेही आश्वासन दिले आहे.
कोविद- 19 रिलिफसाठी देण्यात येणार असलेला 10 कोटी रुपयांचा निधी कल्याण ज्वेलर्सच्या समाजसेवी उपक्रमांचा एक भाग आहे.