हैदराबाद: सीडीके ग्लोबल या ऑटोमोटिव्ह रिटेल उद्योगाला एकात्मिक माहिती तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या आघाडीच्या जागतिक कंपनीने भारतातील मुंबई येथील 28व्या वर्ल्ड एचआरडी काँग्रेसमध्ये फन अॅट वर्क श्रेणीचे विजेतेपद पटकावले आहे.
2007 मध्ये सुरू झालेले वर्ल्ड एचआरडी काँग्रेस 133 हून अधिक देशांतील 1870 हून अधिक प्रोफेशनलना एकत्र आणणारे व्यासपीठ उपलब्ध करते. हा कार्यक्रम एचआर प्रोफेशनलसाठी पर्वणी असते, तसेच आवश्यक असलेली कौशल्य असलेल्या व्यक्तींची निवड करण्यासाठी हे आदर्श व्यासपीठ ठरते.
कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धमाल वातावरण निर्माण करण्यासाठी उत्तेजन व महत्त्व देणाऱ्या कंपन्यांची फन अॅट वर्क दखल घेते आणि त्यांचा गौरव करते. सीडीके ग्लोबल ‘क्रॉसजॅम – बियाँड वर्क’ या नावीन्यपूर्ण व सर्वंकष व्यासपीठाच्या मदतीने आपल्या बहुविध पिढ्यांचा समावेश असलेल्या मनुष्यबळाला यशस्वीपणे सहभागी करून घेत आहे. स्वेच्छेने योगदान देणारी आणि हे उपक्रम चालवण्यासाठी उत्सुक असणारी पॅशनेट टीम हे व्यासपीठ चालवण्यासाठी चालना देते.
क्रॉसजॅम निरनिराळ्या आवडींवर भर देते, जसे क्रीडा, ब्लॉग, क्विझ, नृत्य, फॅशन, इ. कर्मचारी कामाच्या ठिकाणी त्यांची पॅशन पूर्ण करू शकतात आणि त्यामुळे स्वतःची नवी ओळख निर्माण करू शकतात या विचाराने सीडीके इंडियाने क्रॉसजॅम ही संकल्पना आखली व सादर केली. हा विशेष उपक्रम राबवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आनंद व धमाल समाविष्ट करण्यासाठी, भारतातील सर्व 1400 कर्मचाऱ्यांचे विभाजन त्यांच्या जन्म महिन्याच्या नुसार 6 टीममध्ये करण्यात आले. सर्जनशील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक टीममधून एक टीमप्रमुख निवडण्यात आला. गेल्या दोन वर्षांमध्ये, लिव्हिंग पॅशन अॅट वर्क यास उत्तेजन देत, 8 सीडीके क्लबच्या सहयोगाने क्रॉसजॅम अंतर्गत निरानिराळ्या पिढ्यांतील कर्मचाऱ्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करणारे विविध प्रकारचे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांमध्ये, क्रीडा – टेबल टेनिस, क्रिकेट, फिटनेस – स्टेप चॅलेंज, रॅम्प वॉक, रांगोळी, टोस्टमास्टर्स ह्युमरस स्पीच, अंताक्षरी, क्विझ, तम्बोला/हौजी व ब्लॉगेथॉन यांचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये सर्व स्तरांवरील व फंक्शनमधील कर्मचारी मोठ्या संख्येने समाविष्ट होतात आणि सर्व सीडीके कर्मचारी त्यांचा मनमुराद आनंद घेतात व त्यांची प्रतीक्षा करतात.
यानिमित्त बोलताना, सीडीके ग्लोबल इंडियाचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख जॉय जॉर्ज यांनी सांगितले, ”सीडीकेमध्ये धमाल करण्यालाही तितकेच महत्त्व दिले जाते. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असताना, नावीन्यपूर्ण उपक्रमांना नेहमीच उत्तेजन दिले आहे. कर्मचाऱ्यांना आरामदायी वाटेल आणि काम करण्याचा आनंद घेता येईल, असे अनुकूल ऑफिस वाटावरण निर्माण करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आम्ही गुणवत्तेला महत्त्व देतो, याचा आम्हाला अभिमान आहे. कर्मचाऱ्यांमधील खरी क्षमता अजमावण्यासाठी व दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना प्रचंड पाठिंबा देतो. वर्ल्ड एचआरडी काँग्रेसने तिसऱ्यांदा सीडीकेचा गौरव केला आहे. यापूर्वी, सीडीकेला 2017 मध्ये एम्प्लॉयर बिल्डिंग पुरस्कार आणि 2018 मध्ये बेस्ट एम्प्लॉयी एंगेजमेंट अँड लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम असे पुरस्कार मिळाले आहेत. सीडीकेच्या नावीन्यपूर्ण पद्धती व सर्वांना सहभागी करून घेणारी संस्कृती यांची दखल या क्षेत्राने घेतली आहे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
सीडीके ग्लोबल कॉर्पोरेट क्रीडा स्पर्धांमध्येही सक्रिय सहभाग घेते आणि सीपीएल, म्हणजेच सीडीके प्रीमिअर लीग याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. या सामन्यांमध्ये सर्व बिझनेस टीममधील आणि भारतातील हैदराबाद व पुणे या ठिकणचे कर्मचारी सक्रिय सहभाग घेतात. सीडीके ग्लोबल आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे छंद व आवडी जपण्यासाठी, तसेच योग्य वर्क-लाइफ समतोल साधण्यासाठी प्रोत्साहन व उत्तेजन देते.
सीडीके ग्लोबल, इंक.विषयी
2 अब्ज डॉलर उत्पन्न असलेली सीडीके ग्लोबल (Nasdaq: CDK) ही ऑटोमोटिव्ह रिटेल व संबंधित उद्योगांना एकात्मिक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी आघाडीची जागतिक कंपनी आहे. एंड-टू-एंड ऑटोमोटिव्ह कॉमर्सवर भर देणारी सीडीके ग्लोबल जगभरातील 100 हून अधिक देशांतील डीलरना सेवा देते आणि अंदाजे 30,000 रिटेल ठिकाणी व बहुतांश ऑटोमोटिव्ह उत्पादकांना सेवा देते. सीडीके सोल्यूशन्स संपादन, विक्री, फायनान्सिंग, विमा, पार्टचा पुरवठा, वाहनांची दुरुस्ती व देखभाल यांचा समावेश असणारी खरेदी प्रक्रिया व डीलरशिपचे सर्व भाग ऑटोमेट व एकात्मिक करते.