- 2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स – हलके, मोठे इंजिन, सुधारित कामगिरी आणि आधीपेक्षा बरीच जास्त वैशिष्ट्ये
- बरेच काही नवे – पहिल्यांदाच सिक्स अक्सिस आयएमयूची क्षमता लाभलेले मोठे 1100 सीसी इंजिन
- हलके तरीही ताकदवान – पाच किलो वजन कमी करण्यात आलेले नवे आफ्रिका ट्विन 12 टक्के जास्त पीक पॉवर, 11 टक्के पीक टॉर्क आणि वजन गुणोत्तरासाठी 10 टक्के जास्त ताकद देते
- संपूर्ण नियंत्रणासाठी आधुनिक अभियांत्रिकी – 2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सला थ्रॉटल बाय वायर (टीबीड्ब्लयू) द्वारे क्रुझ नियंत्रण, व्हीली नियंत्रण, रियर लिप्ट नियंत्रण आणि नवे 3 स्टेज कॉर्नरिंग लाइट्स देण्यात आले आहेत.
- लांबवरच्या साहसासाठी खास तयार करण्यात आलेले – मोठी 24.8 लीटरची इंधनाची टाकी, अडजस्टेबल 5- स्टेज विंडस्क्रीन आणि हीटेड ग्रिप
- स्मार्ट आणि सोयीस्कर – अपल कारप्ले आणि मल्टी इन्फर्मेशन डिस्प्ले 6.5 इंची टीएफटी टच स्क्रीन
- 2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सला डीसीटी आणि मॅन्युअल (पहिल्यांदाच) ट्रान्समिशन पर्यायाची जोड
नवी दिल्ली– भारतातील साहस सहलींची व्याख्या बदलण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आपली पहिली बीएस- व्हीआय पालन केलेली मोठी बाईक – 2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स लाँच केली आहे.
पूर्वजांची ‘गो एनीव्हेयर’ ही वृत्ती साजरी करण्यासाठी #ट्रुअडव्हेंचर 2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स आणखी मोठी झाली आहे. संपूर्णपणे नव्याने बनवण्यात आलेली अडव्हेंचरर 2020 आफ्रिका ट्विन रॅली मशिनचे स्वरुप परत अनुभवायला देणारी आहे. लहान, सडपाळी आणि 5 किलोने हलकी झालेल्या होंडाच्या या ऑफ- रोडर लीजेंडला नवे मोठे इंजिन, नवी हलकी चासिस, नवे इलेक्ट्रॉनिक्स नवे सस्पेंशन देण्यात आले असून सगळ्या प्रकारच्या प्रदेशात संपूर्ण नियंत्रण देण्यासाठी आवश्यक नवी वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
अतिशय कठीण समजली जाणारी डकार रॅली (जगातील सर्वात अवघड रॅली चॅम्पियनशीप) जिंकण्यासाठी विकसित करण्यात आलेले अडव्हेंचर मशिन म्हणून आपला उगम साजरा करण्यासाठी नवे 2020 आफ्रिका ट्विन आज रिकी ब्राबेक (मॉन्स्टर एनर्जी होंडा संघातील 2020 डकार रॅली वर्ल्ड चॅम्पियन विजेते) यांच्या हस्ते मॅन्युअल (पहिल्यांदाच) आणि डीसीटी ट्रान्समिशन प्रकारांत लाँच करण्यात आले. जानेवारी महिन्यात डकार आव्हान पार करणारे पहिले अमेरिकी रायडर बनता इतिहास घडवणारे 28 वर्षांचे होंडा चॅम्पियन रिकी ब्राबेक हे पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत.
नव्या 2020 आफ्रिका ट्विनचे महत्त्व आणि होंडाच्या पुढील योजनांविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिनोरो तारू म्हणाले, ‘होंडाने आज आपल्या प्रीमियम मोटरसायकल व्यवसायाचा बीएस- व्हीआय टप्पा सुरू केला. साहसाचे दोन जागतिक विजेते म्हणजेच रिकी ब्राबेक (मॉन्स्टर एनर्जी होंडा संघातील 2020 डकार रॅली वर्ल्ड चॅम्पियन विजेते) आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध असलेली 2020 आफ्रिका ट्विन भारतात आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे,की 2020 आफ्रिका ट्विन साहसाला पुढच्या पातळीवर घेऊन जाईल. यापुढेही बिगविंगकडून (होंडाचा प्रीमियम मोटरसायकल व्यवसाय) नव्या, थरारक गोष्टी दिल्या जातील.’
आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्टची नोंदणी जाहीर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. यदुविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘2017 मध्ये पर्दापण केल्यापासून शक्तीशाली आफ्रिका ट्विनने 200 साहसप्रेमी मिळवले आहेत. नवी 2020 आफ्रिका ट्विन #ट्रुअडव्हेंचर प्रमींना आणखी ताकद देणारी आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्या नवी फ्रेम, नवे मोठे इंजिन, अधिक जास्त पीक पॉवर, पीक टॉर्क, नवे इलेक्ट्रॉनिक्स, नवे सस्पेंशन यांमुळे या लीजंडच्या लांबवरच्या टप्प्यावरील ऑफरोड क्षमता उंचावल्या आहेत. डीसीटी आणि मॅन्युअल या दोन प्रकारांसाठीची नोंदणी आजपासून सुरू होत असून सर्व प्रदेश जिंकण्यासाठी सज्ज व्हा.’
2020 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स ही पूर्णपणे नवी का आहे याची काही कारणे –
या गाडीला आता पूर्वीच्या 998 सीसीऐवजी 1084 सीसीचे समांतर ट्विन इंजिन देण्यात आले आहे
नवे इंजिन 12 टक्के जास्त पीक पॉवर, 11 टक्के जास्त पीक टॉर्क दारे असून रेव्ह श्रेणीतील इतरांपेक्षा खूप जास्त बळकट आहे.
हलके तरीही ताकदवान
नवे आफ्रिका ट्विन आधीपेक्षा हलके झाले आहे. त्याचे वजन 5 किलोंनी कमी करण्यात आले असून ते वजनाच्या गुणोत्तराच्या हिशोबात 10 टक्के जास्त ताकद देते. लिथियम इयॉन बॅटरी 1.6 पट जास्त काळ चालते आणि 4 पट जास्त टिकते. .
2020 आफ्रिका ट्विनने ‘डकार’ मशिन सीआरएफ450आर मोटो- क्रॉसरकडून तंत्रज्ञान घेतलेले आहे. फ्रेम पूर्णपणे नव्याने बनवण्यात आली असून त्यात बोल्ट- ऑन अल्युमिनियम सबफ्रेम समाविष्ट करण्यात आली आहे. स्विनगार्मही आता अल्युमिनियम आहे.
आयएमयू – संपूर्ण नियंत्रणामागचे रहस्य
आफ्रिका ट्विनच्या केंद्रस्थानी नवे सिक्स- अक्सिस इंटेरियल मेझरमेंट युनिट (आयएमयू) देण्यात आले आहे. आयएमयू थ्रॉटल बाय वायरचे (टीबीडब्ल्यू) नियंत्रण करते आणि त्याने होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) सातव्या पातळीपर्यंत विस्तारले आहे.त्याशिवाय आयएमयू 2020 मॉडेलमध्ये पहिल्यांदा देण्यात आलेल्या 4 नव्या तंत्रज्ञानांवरही नियंत्रण करते –
व्हीली नियंत्रण, ऑफ रोड सेटिंगसह एबीसी कॉर्नरिंग, रियर लिफ्ट नियंत्रण आणि नवे कॉर्नरिंग डिटेक्शन
1) व्हीली नियंत्रण रायडरला इनपुटच्या तीन पातळ्यांपैकी एक निवडण्याची क्षमता देते. पहिल्या पातळीवर इच्छित व्हील लिफ्ट मिळतो, पण कोणतीही अचानक हालचाल जाणवत नाही. तिसरी पातळी कोणतेही फ्रंट व्हील एलेव्हेशन थांबवते आणि दुसरी पातळी या दोन्हींमधील मध्यम मार्ग आहे.
2) ऑफ रोड सेटिंगसह एबीसी कॉर्नरिंग रायडिंगच्या परिस्थितीनुसार प्रत्येक चाकासाठी आवश्यक ब्रेक ताकदीचे वितरण करते व त्यातून कॉर्नरिंग परिस्थितीत ब्रेकिंगची कामगिरी सर्वात चांगली असेल याची खात्री करते. ऑफ रोड सेटिंग अर्बन, टुर, ग्रॅव्हेल आणि दोन कस्टमायझेबल युजर सेटिंगच्या डिफॉल्ट रायडिंगला साथ देते आणि सर्व प्रकारच्या रायडिंग परिस्थितीत काम करते.
3) रियर लिफ्ट नियंत्रण जोरदार ब्रेकिंग लावले गेल्यास मागील चाकाला जमिनीपासून वर उचलणे शक्य करते.
4) डीसीटी प्रकारातील कॉर्नरिंग डिटेक्शन वैशिष्ट्य बाइकचे कॉर्नरिंग होत असल्याचे ओळकते आणि सर्वात न्यूट्रल गियर बदल अडजस्ट करते.
आरामदायी प्रवास
आफ्रिका ट्विनचे बॉडीवर्क ऑफ- रोडिंगसाठी जास्त आक्रमक आणि आटोपशीर आहे.
संपूर्ण नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या रायडिंग स्थितीमध्ये स्लिमर सेक्शन आसन आणि उंचावरचे हँडलबार्स यांचा समावेश आहे.
2020 साठी आफ्रिका ट्विनला हीटेड ग्रिप आणि अडस्टेबल 5- स्टेज विंडस्क्रीन देण्यात आली आहे, जी 60 एमएमपर्यंत अडजस्टेबल आहे
डेटाइम रनिंग लाइट्ससह (डीआरएल) देण्यात आलेले ड्युएल एलईटी हेडलाइट्स दिवसभरात सातत्यपूर्ण दृश्यमानता देते.
वेग आणि लीन अँगलमध्ये सहजपणे न दिसणारी वळणे कॉर्नरिंग लाइट्स आपोआप प्रकाशमान करते.
ट्युबलेस टायर्समुळे रस्त्याच्या कडेला दुरुस्ती करण्याचा त्रास वाचतो.
एसीसी चार्जिंग सॉकेट्स तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जिंग करतो.
लांब पल्ल्याच्या हायवे प्रवासासाठी आता क्रुझ कंट्रोल देण्यात आले आहे.
लांबवरच्या पल्ल्यासाठी ऑफ टुरिंग क्षमतांमध्ये आता 24.8 लीटरच्या इंधनाच्या टाकीची भर घालण्यात आली आहे.
स्मार्ट सोयीस्कर
- होंडाने पहिल्यांदाच संपूर्णपणे एका रंगातील मल्टी इन्फर्मेशन डिस्प्ले 6.5 इंची टीएफटी टच स्क्रीन डिस्प्ले अपल कार प्ले आणि ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी वैशिष्ट्यासह देण्यात आला आहे. एमआयडीचे चालकाने निवडलेल्या रायडिंग मोडशीस संबंधित विविध पातळींवरील माहिती दाखवण्यासाठी कस्टमायझेशन करता येऊ शकते आणि ग्लोव्ह परिधान केलेले असतानाही ते सहजपणे वापरता येते.
अक्सेसरीज
आफ्रिका ट्विनच्या दोन्ही आवृत्त्यांसाठी विश्वासार्ह होंडा अक्सेसरीजची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करण्यात आली असून त्यात टॉप बॉक्स, व्हिसॉर, क्विक शिफ्टर, मेन स्टँड, रॅली स्टेप इंजिन गार्ड, फ्रंट फॉग लाइट, विंड स्क्रीन (स्मोक) यांचा समावेश आहे.
किंमत आणि उपलब्धता
2020 मध्ये पहिल्यांदाच डीटीसीटी आवृत्तीला आफ्रिका ट्विनच्या लोकप्रिय मॅन्युअल ट्रान्समिशनची जोड मिळाली आहे.
आजपासून होंडाने बिगविंग वितरकांकडे 2020 आफ्रिका ट्विनची नोंदणी सुरू केली आहे.
किंमत रू. 15.35 लाखांपासून सुरू होते (एक्स शोरूम, पॅन भारत)
वितरण मे 2020 पासून सुरू होईल