चाकण: महिंद्रा हेव्ही इंजिन्स लि (एमएचईएल) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, 2016 या आधारभूत वर्षापासून विक्रमी 4 वर्षांमध्ये, म्हणजेच ठरवलेल्या लक्ष्याच्या बरेच आधी ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ करणारी कंपनी ही भारतातील पहिला व जगातील तिसरा उत्पादन प्रकल्प ठरल्याचे आज जाहीर केले आहे. कंपनीने क्लायमेट ग्रुपच्या सहयोगाने ठरवलेल्या क्लायमेट ग्रुप EP 100 कार्यक्रमाच्या बांधिलकीच्या अनुषंगाने हे यश मिळवले आहे.
एमएचईएलने क्लायमेट ग्रुपच्या EP100 या ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी कमीत कमी साधनांद्वारे जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची बांधिलकी जपणाऱ्या एनर्जी-स्मार्ट कंपन्यांना एकत्र आणणाऱ्या उपक्रमाचे सदस्यत्व स्वीकारून हे यश साध्य केले आहे. ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी एमएचईएलने केलेल्या प्रयत्नांमध्ये पुढील कारणांसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा समावेश होता:
- एनर्जी एफिशिअन्सी लाइटिंग
- ऊर्जाबचत करणारे एअर-कंडिशनिंग
- ऊर्जाबचत करणाऱ्या मोटर्स व अप्लायन्सेस
- पर्यायी इंधनांचा वापर
- अन्य नैसर्गिक संसाधनांबरोबरच उर्जेच्या वापराची वेळोवेळी पाहणी करण्यासाठी स्मार्ट मीटरिंग
कंपनीने सायकल टाइममध्ये घट, उत्पादनाच्या योग्य शिफ्ट, संसाधनांचा योग्य वापर याद्वारे उत्पादनातील कार्यक्षमताही वाढवली आणि उपकरणाचा समावेश करणे टाळण्यासाठी प्रक्रियेमध्ये लवचिकता आणली.
या यशाविषयी बोलताना, क्लायमेट ग्रुपचे कार्पोरेट पार्टनरशिप्स डायरेक्टर माइक पिअर्स यांनी सांगितले, “नियोजित वर्षाच्या आधीच ऊर्जा उत्पादकतेमध्ये दुप्पट वाढ करणाऱ्या महिंद्रा हेव्ही इंजिन्स लि.चे अभिनंदन. व्यवसायाच्या धोरणामध्ये उर्जेचा स्मार्ट पद्धतीने वापर समाविष्ट करून, कंपनी ग्रीनहाउस गॅस एमिशन कमी करत आहे, तसेच बॉटम लाइनला चालना देत आहे. हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करणारी एमएचईएल ही भारतातील पहिली EP100 सदस्य आहे आणि कंपनीने अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे. यामुळे अन्य अनेक कंपन्यांना यामध्ये सहभागी होण्याची आणि क्लीन इकॉनॉमीला उत्तेजन देण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व एमअँडएम लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स चीफ विजय कालरा यांनी नमूद केले, “ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याने अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतील. त्यांच्या एकत्र प्रभावामुळे व्यवसायामध्ये शाश्वतता साध्य करण्यासाठी मदत होऊ शकते. EP 100 मुळे महिंद्राला खर्च कमी करणे, नावीन्य आणणे व पर्यावरणाला पाठिंबा देणे शक्य झाले आहे. अल्प कालावधीमध्ये ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ करू शकलो, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”
उर्जेचा वापर कमी कसा करता येईल, यावर जग विचारमंथन करत असताना एमएचईएलने व्यवसायाच्या प्रगतीसाठी आखलेल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ऊर्जाक्षमता समाविष्ट करून आपले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.
EP100वर स्वाक्षरी करणाऱ्या महिंद्रा समूहाच्या अन्य कंपन्या आहेत – महिंद्रा अँड महिंद्रा, बांधिलकी दर्शवणारी जगभरातील पहिली कंपनी; 2016 मध्ये सहभागी झालेली महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि.; 2016 मध्ये सहभागी झालेली स्वराज इंजिन्स लि. व महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.
EP100 विषयी
क्लायमेट ग्रुपच्या जागतिक EP100 उपक्रमामुळे ऊर्जा उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी कमीत कमी साधनांद्वारे जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची बांधिलकी जपणाऱ्या एनर्जी-स्मार्ट कंपन्यांच्या समूहाला एकत्र आणले जाते. व्यवसायाच्या धोरणामध्ये ऊर्जाक्षमतेचा समावेश करून या प्रमुख कंपन्या एमिशनमध्ये घट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत असतानाच, तंत्रज्ञानामध्ये नावीन्य आणत आहेत आणि स्पर्धात्मकतेमध्ये वाढ करत आहेत – त्यांचे अनुकरण करण्यासाठी इतरांना प्रेरणा देत आहेत. वुई मीन बिझनेस सहयोगाचा भाग म्हणून अलायन्स टू सेव्ह एनर्जीच्या भागीदारने क्लायमेट ग्रुप EP100 चे नेतृत्व करतो. वर्ल्ड ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या नेट झीरो कार्बन बिल्डिंग्स कमिटमेंटच्या अनुषंगाने अंमलबजावणी केली जाते. पाहा theclimategroup.org/EP100 किंवा ट्विटरवर फॉलो करा #EP100.
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.